वायग्रापेक्षा ‘हे’ फळ प्रभावी ! बिया खाल्ल्यातरी दूर होते नपुंसकत्व

0

एन पी न्यूज 24 : ऑनलाईन – आरोग्यासाठी विविध फळे खाण्याचा सल्ला डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ नेहमीच देतात. कारण फळांमध्ये अनेक जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच विविध आजारांवर काही फळे रामबाण औषध म्हणून देखील वापरली जातात. यासाठीच औषधी गुणधर्म असलेल्या फळांचे सेवन नियमित करण्याचा सल्ला दिला जातो. शरीराचे संपूर्ण आरोग्य राखण्याची क्षमता फळांमध्ये असते. एक फळ तर वायग्रापेक्षा प्रभावी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या फळांविषयीच आपण जाणून घेणार आहोत.

प्रणयशक्ती वाढते
टरबूज आणि संत्रे ही दोन फळे शरीरासाठी खूपच लाभदायक आहेत. या दोन्ही फळांचे काही खास उपाय आणि फायदे आहेत. टरबूजाच्या बियांचे सेवन केल्यास नपुंसकता दूर होते. या बिया खाल्ल्यानंतर त्यावर दुध आवश्य प्यावे. दररोज टरबूजाचे सेवन केल्यास प्रणयशक्ती वाढते. टरबूजामुळे सेक्स जागृत करणारा हॉमोन्स म्हणजेच टेस्टास्टेरॉन उत्तेजीत होऊन तो अधिक कार्यशील होतो, असे संशोधकांना एका प्रयोगात आढळून आले आहे. आधुनिक विज्ञानातही टरबूजाला वायग्रापेक्षा जास्त प्रभावकारी मानले जाते. टरबूजमध्ये बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असल्याने शरीर नेहमी सशक्त राहते. त्वचेवरील सुरकुत्या नष्ट होतात.

टरबूजाचे अन्य फायदे
* रक्तदाबाची समस्या दूर करण्यासाठी १ कप टरबूजाच्या रसामध्ये १ चिमुटभर काळे मीठ टाकून सेवन करावे.

* टरबूज फॅट फ्री असून यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोट लवकर भरते. डायटिंग करणारे टरबूज खाऊन भूक भागवू शकतात.

* टरबूजाची साल जाळून राख तयार करावी. तोंड आलेल्या रुग्णांना ही राख लावण्यास द्यावी.

* टरबूजाचा रस मातीच्या भांड्यात रात्रभर मोकळ्या आकाशाखाली ठेवावा. सकाळी यामध्ये साखर टाकून हा रस प्यावा. या उपायाने लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.

संत्र्याचे फायदे
* संत्र्याचा रस गरम करून त्यामध्ये काळे मीठ आणि सुंठेचे चूर्ण टाकावे. जेवण झाल्यानंतर हा रस थोडा सेवन करावा. यामुळे अपचन आणि आमाशय संबंधित आजार बरे होण्यास मदत होते.

* संत्री हे उर्जा देणारे फळ आहे. जेवण झाल्यानंतर अर्धा ग्लास संत्रीचे ज्यूस दररोज पिल्यास पोटातील अल्सर ठीक होईल.

* सावलीत वाळवलेल्या संत्र्याच्या साली बारीक करून घ्याव्यात. हे चूर्ण तुपामध्ये समान मात्रेमध्ये मिसळून १-१ चमचा दिवसातून तीन वेळा सेवन केल्यास मुळव्याधीमध्ये आराम मिळतो.

Visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.