प्रशांत किशोर करणार ‘आम आदमी’चा प्रचार, अबकी बार ६७ पार!
नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – दिल्लीत येत्या वर्षात होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष पूर्णपणे सक्रिय झाला आहे. पक्षाने निवडणूक तज्ज्ञ म्हणून देशात चर्चेत असलेले प्रशांत किशोर यांनाही पक्षासोबत घेतले आहे. स्वत: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भातील ट्विट केले आहे.
केजरीवाल यांनी लिहीले आहे की, ही माहिती देताना आनंद होतो की आपल्यासोबत आयपॅक असणार आहे. आपले स्वागत आहे. आयपॅक म्हणजे इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी. ही प्रशांत किशोर यांची संस्था आहे, जी निवडणुकीसंबंधी काम करते. एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम केलेले प्रशांत किशारे देशातील मोठे निवडणुक रणनिती तज्ज्ञ आहेत. पंजाबच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसबरोबर काम केले होते.
केजरीवाल मजबूत खेळाडू
स्वत: आयपॅकने सुद्धा आम आदमी पक्षासोबत काम करणार असल्याची माहिती दिली आहे. या संस्थेने अरविंद केजरीवाल यांना टॅग करून ट्विट केले आहे की, पंजाबच्या निवडणुकीच्या निकालानंतर आम्हाला समजले की तुम्ही सर्वात मजबूत विरोधक होते, ज्यांना आम्ही तोंड दिले. तुमच्यासोबत काम कारणार असल्याने आनंद वाटत आहे.
प्रशांत किशोर हे जेडीयूशी संबंधीत असून सध्या पक्षात त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी त्यांनी आम आदमी पक्षाच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे. सध्या प्रशांत किशोर यांच्याविरोधात जेडीयूचे काही नेते उघडपणे बोलत आहेत. जेडीयू महासचिव आरसीपी सिंह यांनी म्हटले आहे की, जर प्रशांत किशार पक्ष सोडून जाणार असतील तर यासाठी त्यांना स्वातंत्र्य आहे. सिंह यांनी असेही म्हटले होते की, केवळ अनुकंप आधारावर त्यांना पक्षात घेण्यात आले होते. आता प्रशांत किशोर जेडीयू प्रमुख नीतीश कुमार यांची भेट घेणार आहेत.
visit : npnews24.com