Satara Lok Sabha 2024 |बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले साताऱ्यातून निवडणूक लढणार, उदयनराजेंबद्दल म्हणाले…

0

सातारा : Satara Lok Sabha 2024 | छत्रपती शिवरायांचे वारस म्हणून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचवायचे आहे. समाजाला एकत्र घेऊन देशाला नवी दिशा द्यायची आहे. लोकसभेसाठी माझी उमेदवारी मी जाहीर करतो आहे. माझ्या सर्व फॅन्सनी आणि सातारकरांनी माझा विचार करावा. मी सातारा हे नाव जगाच्या नकाशावर नेले. मला आता यावेळी दिल्लीत काम करण्याची संधी द्या, असे आवाहन बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी केले आहे.

भाजपाकडून साताऱ्यातून उमेदवारी मिळावी यासाठी दिल्ली ते मुंबई अशी धावपळ करत असलेले उदयनराजे भोसले यांच्याबद्दल अभिजीत बिचुकले म्हणाले, उदयनराजे भोसले आमचे थोरले बंधू आहेत. राज्यसभेवर ते खासदार आहेत. त्यांना तिकिट मिळते की नाही ते माहीत नाही. पण भाजपापुढे ते का झुकतात? हा माझा प्रश्न आहे.

बिचुकले पुढे म्हणाले, माझे आचार आणि विचार सगळ्यांना माहीत आहे. मात्र मी स्पष्टपणे सांगतो आहे की मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. साताऱ्यातून उदयनराजे महायुतीकडून लढण्यास इच्छुक आहेत. तसेच महाविकास आघाडी ही जागा कुणाला देणार? हे पाहणेही महत्त्वाचे आहे.

अभिजीत बिचुकले म्हणाले, कुठला पक्ष, कुठले नेते, कोण कुणाचे कार्यकर्ते, सतरंज्या उचलणारे आहेत याचे मला काही घेणेदेणे नाही. २००४, २००९, २०१४, २०१९ या चार निवडणुका मी लढवल्यात. माझे अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला. साताऱ्याच्या जनतेने २००९ मध्ये मला बारा हजारांहून जास्त मतदान केले होते. आताही तसेच मतदान होईल, असा विश्वास बिचुकले यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.