Ajit Pawar In Wrestlers Meet Pune | कुस्तीच्या आखाड्यातही अजितदादांचा राजकीय डाव, पैलवानांना आवाहन, म्हणाले ”मी काय फक्त बारामती, बारामती करायला…” (Video)

0

पुणे : Ajit Pawar In Wrestlers Meet Pune | कुस्ती महासंघातील वादाचे पडसाद गल्ली ते दिल्लीपर्यंत पाहायला मिळाले. हे वाद आपल्याला मिटवायचे आहेत. त्यासाठीच आज आपण हितगुज साधत आहोत. पण मी काय फक्त बारामती, बारामती करायला आलेलो नाही. मी कोणत्याही स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेले नाही. शिरूर (Shirur Lok Sabha), मावळ (Maval Lok Sabha), पुणे (Pune Lok Sabha) आणि बारामती (Baramati Lok Sabha) अशा चारही लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे, असे म्हणत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पैलवानांवर देखील राजकीय डाव टाकला.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आज पुण्यात नामांकित वस्ताद आणि कुस्तीगीरांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, मला बारामती लोकसभेतील पैलवानांची मदत घ्यायची आहे, असे मी पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यासाठी आपण आज वस्ताद आणि पैलवानांचा मेळावा आयोजित केला आहे. पैलवानांचा मोठा वारसा आपल्या राज्याला लाभलेला आहे. महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesari) पातळीवर आपण हे अनुभवतो.

अजित पवार पुढे म्हणाले, आम्ही साधुसंत नाही. आम्ही राजकीय नेते आहोत. तुमच्या सहकार्याने आम्ही सरकार चालवतो. पैलवानांना ही प्रतिनिधित्व करता यावे, यासाठी आपण पुणे लोकसभेत मुरलीधर मोहोळांना उमेदवारी दिलेली आहे. तुमच्यातील एक सहकारी मुरलीधर मोहोळांच्या रूपाने लोकसभेत जाणार आहे. एकंदरीत कल पाहता मोहोळ मोठ्या मताधिक्याने निवडून येतील.

खेळाडूंना आश्वासन देताना अजित पवार म्हणाले, यंदा प्रत्येकाने मतदान करा, तुमचे आमुल्य मत महायुतीच्या उमेदवारालाच द्या. कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि येत्या काळाज प्रत्येक खेळाडूला आम्ही हवी ती मदत करु.

Leave A Reply

Your email address will not be published.