MLA Nilesh Lanke | नगरमध्ये राजकीय हालचालींना वेग, निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, बोलावली तातडीची सभा

0

अहमदनगर : MLA Nilesh Lanke | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार निलेश लंके हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Lok Sabha) भाजपा (BJP) उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा शरद पवार (Sharad Pawar) यांची पुण्यात भेट देखील घेतली. परंतु, आमदारकी सोडल्याशिवाय त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारीबाबत निर्णय जाहीर करणे शक्य नव्हते.

दरम्यान, आज लंके यांनी त्यांच्या समर्थकांची तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीत ते आमदारकीचा राजीनामा देण्याबाबत, तसेच शरद पवार गटाच्या उमेदवारीबाबत निर्णय घेऊ शकतात.

निलेश लंके यांनी आज सुपा-अहमदनगर मार्गावर (Supa Ahmednagar Road) एका बैठकीचे आयोजन केले आहे. लंके यांनी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील (Parner Ahmednagar Vidhan Sabha) राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक, सभासद आणि हिंतचिंतकांना या बैठकीला बोलावले आहे. या बैठकीत लंके कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जर निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवली तर नगरमध्ये भाजपा विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके असा सामना होऊ शकतो. आज, उद्या याबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारण येथे राजकीय हालचालींना सध्या वेग आला आहे. आजच्या बैठकीत निलेश लंके आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.