Maval Lok Sabha Election 2024 | मावळ मतदारसंघात होणार तिरंगी लढत, ‘वंचित’च्या उमेदवारामुळे चुरस वाढणार

0

पिंपरी : Maval Lok Sabha Election 2024 | वंचित (Vanchit Bahujan Aghadi) ज्या-ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर करत आहे, तिथे तिरंगी लढती होताना दिसत आहेत. पुणे, शिरूरनंतर आता मावळ मतदार संघात सुद्धा वंचित उमेदवार देणार असल्याने येथे तिरंगी लढत होऊ शकते. मात्र, अद्याप वंचित आघाडीने उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही.

मावळमध्ये महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेचे (Eknath Shinde Shivsena) विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) ठाकरे गटाचे संजोग वाघेरे (Sanjog Waghere) निवडणूक रिंगणात आहेत. येथे दुरंगी लढत होणार होती, मात्र आता वंचितही रिंगणात उतरणार असल्याने ही निवडणूक तिरंगी आणि चुरशीची होईल.

वंचित बहुजन आघाडी येत्या दोन दिवसात मावळचा उमेदवार जाहीर करणार आहे, वंचितकडून सांगण्यात आले. मागील निवडणुकीत येथे वंचितच्या उमेदवाराने लाखभर मते घेतली होती.

मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि रायगड (Raigad) जिल्ह्यातील पनवेल (Panvel Vidhan Sabha), उरण (Uran Vidhan Sabha) , कर्जत (Karjat Vidhan Sabha) या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने दोन्ही पक्षांची ताकद विभागली आहे, त्यामुळे सर्वच राजकीय गणितं बदलली आहेत. त्यामुळे मागच्याप्रमाणेच निकाल लागण्याची शक्यता कमीच आहे.

मागीलवेळी मावळमध्ये रायगड जिल्ह्यातील राजाराम पाटील यांनी वंचिकडून निवडणूक लढविली होती. पाटील यांनी तिसऱ्या क्रमांकाची ७५ हजार ९०४ मते मिळवली होती. त्यांना चिंचवडमध्ये १७,२०९ आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात १७,७९४ मते मिळाली होती. पनवेलमध्ये १५,९२६, मावळमध्ये ११,७३१ मते मिळाली होती. उरण आणि कर्जतमध्ये त्यांना दहा हजारांपेक्षा कमी मते मिळाली होती.

विशेष म्हणजे पाटील यांनी प्रचार केला नव्हता. तरीदेखील ७६ हजार मते मिळाली होती. मावळ आणि रायगडमध्ये वंचितला मानणारा मोठा मतदार असून मराठा आरक्षण आंदोलनानंतर (Maratha Reservation Andolan) अनेक राजकीय गणिते बदलली आहेत. त्यामुळे मावळचा निकाल काय लागणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.