हैद्राबाद, उन्नावनंतर आता फतेहपुरमध्ये तरूणीवर बलात्कार, जिवंत जाळले
फतेहपुर : एन पी न्यूज 24 – फतेहपुरच्या हुसेनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तरूणी घरात एकटी असल्याचे पाहून एका युवकाने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला जिवंत जाळून तो फरार झाला. गंभीर अवस्थेत तरूणीला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिने दिलेल्या जबाबात नात्याने काका असलेल्या तरूणावर आरोप केला आहे.
या पीडितेच्या वडीलांनी सांगितले की, १८ वर्षांची मुलगी घरात एकटी होती. तर पीडितेने सांगितले की, नात्याने काका असलेला २२ वर्षीय आरोपी तिच्याकडे घाणेरड्या नजरेने बघायचा. शनिवारी दुपारी तो घरात शिरला आणि विरोध करत असतानाही त्याने वाईट कृत्य केले. यावेळी तिने कुटुंबातील लोकांना घडलेला प्रकार सांगण्याची धमकी दिल्याने आरोपी काकाने रॉकेल टाकून तिला पेटवून दिले.
पेटलेल्या आवस्थेत तरूणी ओरडू लागल्यानंतर आजूबाजूचे लोक धावून आले. या लोकांनी घडलेला प्रकार पोलिसांना कळवला. तातडीने रूग्णवाहिका आल्यानंतर तिला रूग्णालयात हलविण्यात आले. तत्पूर्वी, प्रमुख पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. महिला अधिकाऱ्याने तरूणीचा जबाब नोंदवूण घेतला आहे. तिची प्रकृती बिघडू लागल्याने तिला १.३० वाजता हॅलेट रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांचे एक पथक आरोपीचा शोध घेत आहे.
visit : npnews24.com