Ravindra Dhangekar On BJP | मोदींची हवा असती तर त्यांच्या पक्षाला बाहेरच्या नेत्यांचा आधार घ्यावा लागला नसता; रविंद्र धंगेकर यांचा भाजपला टोला

0

पुणे : Ravindra Dhangekar On BJP | काॅंग्रेसचे (Congress) पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha Election 2024) उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रथमच पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली. ‘हू इज धंगेकर’ (Who Is Dhangekar) म्हणून मला ट्रोल केले जाते, पण देशात जर मोदींची हवा असती तर भाजपला अजित पवार (Ajit Pawar), अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना पक्षात घ्यावे लागले नसते असा टोला त्यांनी लगावला आहे.

धंगेकर यांच्या शिक्षणावरून भाजपने त्यांना ट्रोल केले आहे . ‘मविआचा अशिक्षित उमेदवार’, ‘रवींद्र धंगेकर फक्त आठवी पास !’ , ‘शिक्षणाचे माहेरघर पुण्यात उमेदवारच अशिक्षित’ असे लिहीलेला आणि धंगेकरांचा फोटो असलेला मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आला. भाजपने या माध्यमातून धंगेकरांचे शिक्षण काढत त्यांना ट्रोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

मात्र भाजपचं हे ट्रोलिंग धंगेकरांनी मनावर घेतलेच नाही. उलट त्यांनी या ट्रोलर्सचा पुरेपूर समाचार घेत चोख प्रत्युत्तर दिले असून ‘ ते माझ्या शिक्षणावर घसरलेत म्हणजे त्यांना त्यांचा पराभव दिसतो आहे ’ असे सांगत माझी जनतेच्या कामांमध्ये पी.एचडी झाली आहे, जनतेने मला पीएचडीची पदवी दिली, आहे असा टोला त्यांनी लगावला.

मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर धंगेकर यांना उमेदवारी आधीच जाहीर झाली आहे. भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांचे नावही सर्वात आधी जाहीर झालं आहे. त्यामुळे पुण्यात आता तिहेरी लढत होणार आहे. वंचितकडून वसंत मोरे यांचं नाव जाहीर झाल्यावर धंगेकर यांनी प्रतिक्रिया देत मोरे यांना सल्ला दिला आहे. ‘डोकं शांत ठेवा ‘ असे धंगेकर मोरेंना सांगतात.

ते म्हणाले ” ही निवडणूक पुणेकर लढणार आणि पुणेकरच जिंकणार आहेत. लोकशाहीमध्ये कोणीही कुठूनही निवडणूक लढू शकतो, तो ज्याचा त्याचा संविधानिक अधिकार आहे. जो उमेदवार लोकशाहीसाठी लढेल, लोक त्यालाच मतदान करतील. वचिंत बहुजन आघाडीने वसंत मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मोरे अनेक पक्षातील नेत्यांना भेटले.‌ते कोणत्याही पक्षात गेले तरी ते निवडणूक लढवणारच होते. डोके शांत ठेवा, असाच सल्ला मी त्यांना देईन.”

Leave A Reply

Your email address will not be published.