पदवीधर युवकांना सरकारी नोकरीची संधी!  ३४,००० पेक्षा जास्त मिळेल पगार

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – पदवीप्राप्त युवकांसाठी सरकारी नोकरीची संधी असून मध्यप्रदेश लोकसेवा आयोग पदवीधरांसाठी ही भरती करणार आहे. या भरतीतून उपजिल्हाधिकारी, डीएसपी, महसूल विभाग, जनसंपर्क आणि अर्थ विभागातील अनेक पदे भरण्यात येणार आहेत.

भरतीद्वारे एकुण ३३० पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी MPPSC च्या mppsc.nic.in आणि mppsc.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर म्हणजे आजची आहे. यासाठी आजच अर्ज करावा.

या पदांसाठी १२ जानेवारीला लेखी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा दोन भागात होणार आहे. पहिल्या भागात सामान्यज्ञान आणि दुसऱ्या भागात शारीरीक चाचणी होणार आहे. पहिल्या भागात यशस्वी उमेदवारच दुसऱ्या भागात सहभागी होऊ शकतील.

वय : उमेदवाराचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे असावे.

शुल्क : उमेवाराला अर्ज करताना ५० रूपये शुल्क भरावे लागणार आहे.

असा करा अर्ज

– mppsc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.
– होमपेजवरील ऑनलाईन अर्जावर क्लिक करा.
– state services exam टॅबवर क्लिक करा.
– रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक करा.
– रजिस्ट्रेशन आयडीचा वापर करून लॉग-इन करा.
-अर्ज भरा, कागदपत्र अपलोड करा.
-शुल्क भरा आणि सबमिट करा.

असा असेल पगार :
पहिल्या आणि दुसèया श्रेणीत निवड झालेल्या उमेदवारांना १५,८०० ते  ३९,१०० रुपये पगार मिळणार आहे. यासाठी ५४०० रुपये ग्रेड पे दिला जाणार आहे. तर तिसऱ्या श्रेणीत निवड झालेल्या उमेदवारांना ९,३०० रूपये ते ३४,८०० रुपये पगार मिळणार आहे. यासह ३६०० रुपये ग्रेड पे असेल.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.