विनाशुल्क एटीएएममधून कितीही वेळा काढा पैसे! एसबीआय आणि कॅनरा बँकेची विशेष सेवा

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – एसबीआय आणि कॅनरा बँकेने कार्डलेस ट्रांजेक्शनची नवी सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत तुम्ही कुठेही आणि केव्हाही एटीएममध्ये जाऊन कितीही वेळा पैसे काढू शकता. यासाठी एसबीआय आपल्या ग्राहकांकडून काणतेही शुल्क आकारणार नाही.

असे काढा पैसे

१ एसबीआय योनो अ‍ॅपद्वारे पैसे काढण्यासाठी प्रथम आपल्याला योनो अ‍ॅप डाऊनलोड करावे लागले. यानंतर नेटबँकिंग युजरआयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल. अ‍ॅक्टिव्ह युजरआयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर पुन्हा लॉगइन करा.

२ एकदा अ‍ॅक्टिव्ह केल्यानंतर या अ‍ॅपसाठी एक सहाअंकी कोड सेट करू शकता. अ‍ॅपमध्ये लॉगइन करताच स्क्रीनवर डावीकडे तिसरे ऑप्शन योनो कॅश आहे. हे उघडल्यानंतर एटीएम, मर्चंट पीओएस, सीएसपी आणि कार्डलेस शॉपिंग हे ऑपशन दिसतील.

३ एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी तुम्हाला पहिला ऑप्शन स्वीकारावा लागेल. त्यापुढील स्क्रीन पैसे काढण्याची माहिती द्यावी लागेल. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर सहा आकडी अंकाचा पिन टाकावा लागेल, जो पैसे काढताना रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल.

४ नेक्स्टनंतर पुढील स्क्रीनवर टर्म आणि कंडिशन्स बॉक्सवर टिक केल्यावर कन्फर्म बटन दाबावे. यानंतर मोबाईलवर पाच अकडी कॅश ट्रान्झॅक्शन क्रमांकाचा मेसेज येईल.

४ हा सीएसएन आणि पिन चार तासांसाठी वैध असेल. स्टेट बँकेच्या एटीएममध्ये योनो कॅशवर क्लिक केल्यानंतर या दोन्ही क्रमांकांचा वापर करून आपण पैसे काढू शकता.

* कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी कार्डलेस कॅश काढण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. यासाठी कॅनरा बँक अ‍ॅप डाउनलोड करून ते अ‍ॅक्टिव्हेट करावे. यातही एक वेळ रजिस्ट्रेननंतर पिनचे ऑपशन आहे, जे पुढे लॉगइनसाठी उपयोगी पडते.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.