मधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ

0

पुणे : एन पी न्यूज 24 – मधुमेही रुग्णांना डॉक्टर नेहमी गोड पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. कारण मधुमेहाच्या रुग्णांना गोड खाणे धोकादायक असते. बदलत्या जीवनशैलीनमुळे हा धोका आणखी वाढला आहे. परंतु, दिवाळीसारख्या सणात गोड पदार्थांपासून दूर राहणे थोडेसे कठिणच असते. त्यामुळे लोकांच्या आरोग्याची काळजी घेत तसेच त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेता बाजारात शुगर फ्री सारखे मिठाई उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे हे मिठाई खाऊन तुम्ही तुमच्या दिवाळीच्या आनंदात आणखी भर घालू शकता. तर, जाणून घेऊया या मिठाईंबद्दल.

१. शुगर फ्री बेसन लाडू

बेसन, तूप आणि भरपूर प्रमाणात साखर घालून तयार केलेले बेसनचे लाडू आवडत नाही असा एकही व्यक्ती नसेल. परंतु मधुमेहग्रस्तांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन विक्रेते विविध प्रकारचे मिठाई तयार करत आहेत. त्यातीलच एक शुगर फ्री लाडू. यामध्ये साखर असत नाही आणि ते खाण्यासही खूपच स्वादिष्ट असते.

२. खजूर रोल

दिवाळीत कॅलेरीजला घेऊन काही लोक खूपच जागरूक असतात. अशा लोकांसाठी खजूर खाणे लाभदायक ठरते. बदामच्या तुकड्यांनी गार्निश करून खजूर रोल खाऊ तुम्ही खाऊ शकता. हे तुमच्या आरोग्यासाठीसुद्धा चांगले असते.

३. अंजीर बर्फी

अंजीर हे आरोग्यासाठी खूपच लाभदायक असते. हे पचनक्रिया सुरळित करण्यासोबतच मधुमेहालाही नियंत्रित करते. अंजीरपासून बनवलेल्या बर्फीत रिफाइंड शुगर अजिबात नसते. हे मिठाई काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, तूप आणि मध यापासून बनवले जाते. लहान मुले आणि मोठे असे दोघांच्याही आरोग्यासाठी ही मिठाई चांगली असते.

४. फिनी

फिनी हे एक पारंपरिक राजस्थानी मिठाई आहे. हे प्रामुख्याने राज्यस्थानच्या बिकानेरमध्ये मिळते. पीठ, साखर आणि शुद्ध तूपापासून बनलेली ही मिठाई आजकाल मधापासून तयार केली जाते आणि हे शुगर-फ्री असते.

५. लौकी हलवा

दिवाळीत तुम्ही लौकी हलवासुद्धा खाऊ शकता. एक डालडा, इलायची पावडर, दूध आणि स्टेविया घालून ही मिठाई तयार केली जाते.

६. खजूर-नारळ रोल

खजूर- नारळ रोल हे खजूर, बदाम आणि एक कप खोबऱ्याचा किस घालून तयार केले जाते. यामध्ये २ ग्राम फायबर असते. डायबिटीज रुग्णांसाठी हे खूपच लाभदायक आहे.

७. सफरचंदाचे खीर

दिवाळीत शुगर फ्री खीर बनवण्यासाठी एक किसलेला सफरचंद, खजूर आणि एक छोटा चमचा अक्रोडची आवश्यकता असते. स्वाद देण्यासोबतच ही खीर तुमच्या आरोग्याची काळजी घेईल.

visit : http://npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.