प्रदूषणापासून होणाऱ्या समस्या सोडविण्यात ‘हे’ पदार्थ ठरतील उपयोगी

0

पुणे :  एन पी न्यूज 24 – घरातून बाहेर पडताच तुम्हाला जर श्वास घेण्यात अडचण होत असेल तर समजून घ्या कि हे वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे. गाडी-कारखान्यांमधून निघणारा विषारी वायू हवेत मिसळल्याने हवेचे प्रदूषण होत असते. त्यामुळे वाढत्या प्रदूषणामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हालाही प्रदूषणामुळे त्रास होत असेल तर घरात असणारे हे ४ पदार्थ प्रदूषणापासून तुम्हाला होणारे त्रास कमी करण्यास मदत करतात. तर जाणून घेऊया, याबद्दल.

आले

वाढत्या प्रदूषणामुळे सतत सर्दी किंवा इंन्फेक्शन होत असते. त्यामुळे अशा वेळी अद्रकचे सेवन करणे लाभदायक असते. यासाठी १ चमचा मधात अद्रकचे रस मिसळून दिवसभरात २ ते ३ वेळा पिल्याने सर्दीच्या समस्येपासून सुटका मिळते.

गुळ

गुळ आणि मध खाल्ल्याने शरीरात रोगप्रतिकारक क्षमतेचा विकास होतो. याद्वारे अनेक आजारांवर मात करता येते. प्रदूषणाच्या साईड इफेक्टला कमी करण्यातही याची मदत होते.

लसूण

लसूण हे एक अँटिबायोटिक आहे. प्रदूषणापासून होणाऱ्या परिणामापासून वाचण्यासाठी हे खूपच लाभदायक आहे. यासाठी लसूणच्या काही पाकळ्यांना १ चमचा लोणीमध्ये शिजवून खावे. हे खाण्याच्या अर्धा तास अगोदर आणि नंतर इतर कोणतेही पदार्थ खाऊ नये. कफ या समस्येला दूर करण्यात हे घरेलू उपाय खूपच फायदेशीर ठरतात.

ओवा

नियमितपणे ओव्याची पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होत असते. याव्यतिरिक्त आहारात फळे आणि पालेभाज्यांचे सेवन अधिक प्रमाणात करावे. यासोबतच योग्य प्रमाणात पाणीसुद्धा पिणे आवश्यक आहे.

visit :http://npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.