किडनी स्टोनच्या विकारावर जांभळाच्या बिया उपयुक्त

can berries
27th September 2019

पुणे : एन पी न्यूज 24 – किडनी स्टोन (मुतखडा)ची समस्या आजकाल सामान्य होत चालली आहे. पूर्वी मुतखडा झालेल्या रुग्णांची संख्या फारच कमी होती परंतु आता या आजाराच्या विळख्यात अनेकजण अडकले आहेत. या आजारामध्ये रुग्णाला असह्य वेदना सहन कराव्या लागतात.यापासून सुटका मिळवण्यासाठी सामान्यपणे ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. पण काही प्रकरणांमध्ये काही औषधांनीही ही समस्या दूर होते. जांभळाच्या बियांनीही किडनी स्टोनची समस्या दूर होते. आयुर्वेदात जांभळाच्या बियांचा वापर किडनी स्टोन दूर करण्यासाठी केला जातो.

जांभळाच्या बियांचा वापर करण्यासाठी तुम्हाला त्याची पावडर तयार करावी लागेल. आधी या बीया चांगल्याप्रकारे धुवा. त्यानंतर त्या उन्हात वाळत ठेवा. त्यानंतर त्याची साल काढून छोटे छोटे तुकडे करा आणि मिक्सरमधून त्यांची बारीक पावडर तयार करा. हे तयार पावडर एका बाटलीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवा.

जांभळाची बी ही मधुमेह रुग्णांसाठीही फायेदशीर मानली जाते. जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये जांभळाच्या बियांचं पावडर टाकून प्यायलात तर फायदा होऊ शकतो.

जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर जांभळाच्या बियांच्या पावडरचा वापर करा. रोज सकाळी आणि सायंकाळी कोमट पाण्यामध्ये १ चमचा पावडर टाकून सेवन करा. तुमची किडनी स्टोनची समस्या काही दिवसातच दूर होऊ शकते. पण हे करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

visit : http://npnews24.com