कौतुकास्पद ! अमेरिकन सैनिकांनी वाजवले ‘जण गण मन’ (व्हिडीओ)

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकन सैनिकांचा भारताच्या राष्ट्रगीतावर असलेला अभ्यास दाखवणार एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेच्या मैककॉर्डमधील बेस लेविसमध्ये सुरु होता. 2019 मधील भारत – अमेरिकाच्या संयुक्त युद्धाभ्यासावेळेसचा हा व्हिडीओ आहे. अमेरिकन सैनिकांनी बॅण्डवर वाजवलेली भारताच्या राष्ट्रगीताची धून दोनीही देशांमधील संबंध पक्के होण्याचे संदेश देत आहे.

वॉशिंगटनच्या लुईस मैककॉर्डमध्ये भारतीय सैनिक आणि अमेरिकन सैनिक सोबत मिळून युद्धाभ्यास करत आहेत. दोन्ही देशांमध्ये असलेले संबंध अजून मजबूत करण्यासाठी हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

व्हिडिओमध्ये स्प्ष्ट दिसत आहे की, अमेरिकन सैनिकांची एक तुकडी बॅण्डवर भारताचे राष्ट्रगीत वाजवत आहे. यातील सर्वात महत्वही गोष्ट म्हणजे यात केवळ पुरुष सैनिकच नाहीत तर महिला सैनिकांचाही मोठा सहभाग आहे.

या अभ्यासाला ‘युद्ध अभ्यास २०१९’ असे नाव देण्यात आले आहे. भारत आणि अमेरिकेच्या सैनिकांचे हे १५ वे संस्करण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.