पोलिस दलात मोठे ‘बदल’ करण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे ‘संकेत’ !

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी पोलीस दलात बदल करण्याचे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील असा इशारा दिला आहे. ते दिल्लीत पोलीस संशोधन आणि विकास संस्थेच्या 49 व्या स्थापना दिनानिम्मित उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, काळ बदलला आहे, त्यामुळे आपल्या समोरील समस्या देखील बदलल्या आहेत. त्याचा सामना करण्यासाठी पोलिसांना आधुनिक बनवणे आवश्यक आहे.

BPR&D साठी तयार करावा लागणार नवा आराखडा –
अमित शाह म्हणाले, पोलिस दलात पोलीस रिफॉर्म अशी एक संकल्पना आहे, ज्यासाठी ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च डेवल्पमेंट कडून नव्या पद्धतीचा आराखडा तयार करण्याची गरज आहे. ते म्हणाले की आरपीसी आणि आयपीसी अंतर्गत आवश्यक परिवर्तनासाठी देशात एक कंसल्टिंग प्रकिया सुरु करण्याची आवश्यकता आहे. सर्वांच्या सूचना घेऊन ते गृहमंत्रालयाकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी.

दोषींना तात्काळ शिक्षा देण्यास मिळेल मदत –
पोलीस दलाच्या तपास प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी शाहनी फॉरेन्सिक सायन्स युनिवर्सिटी आणि कॉलेजला प्रोस्ताहन देण्यावर भर दिला. त्यांच्या मते पोलीस दलात बदल केल्यास दोषींना लवकर शिक्षा मिळण्यास मदत मिळेल त्यामुळे गुन्हा करण्याची मानसिकता देखील कमी होईल.
अमित शाह म्हणाले, पंतप्रधान मोदी देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन करण्यावर भर देत आहेत, यासाठी देशातील सुरक्षा अत्यंत मजबूत असणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.