गणपती विसर्जनदरम्यान नाव उलटून 11 जणांचा मृत्यु

0

भोपाळ : वृत्तसंस्था – गणपती विसर्जनाप्रसंगी भोपाळमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. विसर्जनासाठी गेलेल्या लोकांनी भरलेली बोट उलटून त्यात ११ जणांचा मृत्यु झाला. तर ७ जणांना वाचविण्यात यश आले आहे. भोपाळमधील खटलापुरा घाटावर ही घटना गुरुवारी दुपारी ११ वाजता घडली.

हे सर्व भोपाळमधील पिपलानी येथील राहणारे असल्याचे सांगण्यात येत आहे. नाव उलटल्याचे दिसल्याने एसडीआरएफच्या पथकाने रेस्क्यु ऑपरेशन सुरु करुन सात जणांना वाचविले. तलावात ११ जणांचे मृतदेह मिळाले आहेत.

एकाचवेळी या बोटीमध्ये १८ जण बसले होते. तलावाच्या आतमध्ये गेल्यानंतर गणपतीचे विसर्जन करीत असताना लोक एकाच बाजूला जास्त जण आले. त्यामुळे बोटीचा समतोल बिघडून ती उलटली.
याबाबत मध्य प्रदेशचे जनसंपर्क मंत्री पी. सी. शर्मा यांनी प्रत्येक मृत्य व्यक्तीच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Leave A Reply

Your email address will not be published.