कलम 370 ! पाकिस्तानच्या ‘त्या’ खोट्या प्रचाराला बळी न पडता 575 काश्मीरी तरूण लष्करात भरती

0

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 काढून टाकल्यानंतर पाकिस्तानकडून आकांडतांडव करण्यात येत आहे. काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा निर्णय ही भारताची अंतर्गत बाब आहे, असे भारताने जगाला सांगितले आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर कोणताही देश पाकिस्तानला पाठिंबा देण्यास तयार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तान एकाकी पडला आहे. त्यामुळे दहशतीचा मार्ग अवलंबून काश्मीर खोऱ्यातील मुस्लिम जनतेला भडकावण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून चालू झाला आहे. तसेच पाकिस्तान जगभरात भारत काश्मीरमध्ये अत्याचार करत असल्याचा प्रचार करत फिरत आहे. मात्र या खोट्या प्रचाराला बळी न पडता काश्मीरमधील 575 तरुणांनी आज भारतीय लष्करात भरती होऊन पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे.

श्रीनगरमध्ये शुक्रवारी लाइट इन्फेंट्री रेजिमेंट सेंटरच्या पासिंग आऊट परेडमध्ये 575 युवकांनी सेंटरमध्ये प्रवेश केला. या प्रवेश करणाऱ्यापैकी एक असलेल्या श्रीनगरच्या वसीम अहमद मीरने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वसीम अहमद मीर म्हणाला की, ‘माझे वडीलही सैन्यात होते, त्यांच्या गणवेशामुळे मला सैन्यात भरती होण्यास प्रेरित केले. मी खूप आनंदी आहे, माझ्या पालकांना अभिमान वाटतो. रेजिमेंट सेंटरच्या पासिंग आऊट परेडमध्ये शारीरिक दृष्ट्या बरेच काही शिकायला मिळते.’
https://twitter.com/ANI/status/1167673969442529281/photo/1

इम्रान खानची पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी –
काश्मिर मुद्द्यावरून पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे दरवाजेही ठोठावले. मात्र सुरक्षा परिषदेने एकांगी कारवाईस नकार दिला. जागतिक पातळीवर पाकिस्तान एकटा पडला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज पुन्हा एकदा काश्मिरचा राग आळवला आहे. जोपर्यंत भारत सरकार जम्मू-काश्मीरमधून विशेष राज्याचा दर्जा काढून टाकण्याचा निर्णय घेत मागे नाही आणि काश्मीरवर लावलेले निर्बंध हटवत नाही तोपर्यंत भारताशी चर्चा करणं शक्य नाही. काश्मीरमधून तत्काळ प्रभावाने भारताने आपले सैन्य मागे घ्यावे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे.

कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत सामान्य होत आहे. गेल्या काही दिवासांपासून राज्यातील लोकांना अनेक बंदीमुळे अडचणीचा सामना करावा लागला होता. पण आता काश्मीरचे जनजीवन पुन्हा सुरळीत सुरु झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.