बहुचर्चित ‘राफेल’ दसऱ्याला होणार वायू दलात सामील

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बहुचर्चित आणि राहुल गांधी यांनी ज्या खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार चोर है याचा आरोप केला होता, ते राफेल विमान भारतीय वायु दलात ८  ऑक्टोबर रोजी सामील होणार आहे. या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक विचार करुन ही तारीख निवडण्यात आली आहे. ८ ऑक्टोंबरला दसरा आहे. तसेच वायुसेना दिवस आहे. फ्रान्स येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सरंक्षण मंत्री राजनाथसिंह, सरंक्षण सचिव अजय कुमार आणि अन्य काही वरिष्ठ अधिकारी जाणार आहेत.

भारताने २०१६ मध्ये ३६ राफेल लडाऊ विमानांसाठी फ्रान्सबरोबर ५८ हजार कोटी रुपयांचा करार केला होता. आता त्यातील पहिले विमान भारताला मिळणार आहे. या करारानुसार पायाभूत सुविधा आणि भारतीय पायलटांना प्रशिक्षण देण्याचे काम यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. विमानांचा एक ताफा अंबाला तर दुसरा पश्चिम बंगालमधील हासिमारा येथे तैनात करण्यात येण्याची शक्यता आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात अनेक वर्ष केवळ चर्चाच्या पातळीवर राहिलेल्या या करारातील जुना १३६ विमान खरेदीचा करार रद्द करुन नरेंद्र मोदी यांनी ३६ विमाने खरेदीचा करार २०१६ मध्ये फ्रॉन्स दौऱ्यात केला होता. असा करार होणार आहे, याची कोणतीही माहिती तत्कालीन सरंक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना नसल्याचे सांगितले जाते. या करारामुळे मोदी यांनी आपले मित्र अनिल अंबानी यांचा ३० हजार कोटी रुपयांचा फायदा करुन दिल्याचा आरोपी राहुल गांधी यांनी केला होता. त्यावरुन त्यांनी मोदी यांच्या विरोधात चौकीदार चोर है ही मोहीम राबविली होती. या करारातील अनेक संशयास्पद बाबीं हिंदु व इतर वृत्तपत्रांनी उघड केल्या होत्या. त्यावर मात करण्यासाठी व लोकांचे दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी मै भी चौकीदार ही मोहीम सुरु केली होती. या मोहिमेद्वारे त्यांनी विरोधकांनी उठविलेला मुद्दा निष्पभ केला होता. त्यानंतर आता राफेल विमान प्रत्यक्ष हवाई दलात सहभागी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.