मोदी सरकारचं ड्रायव्हर, ‘मेड’ आणि माळी यांना ‘मोठं’ गिफ्ट, आता मिळणार PF चा फायदा

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षेनुसार फायदा मिळावा याचा विचार करुन सध्याच्या पीएफ कायद्यात बदल करण्यात येणार आहे. कामगार मंत्रालयाने सध्याच्या पीएफ कायद्यात बदल करण्यासंबंधित तीन प्रकारचे प्रस्ताव दिले आहेत.

पहिला प्रस्ताव –
सर्वात पहिला प्रस्ताव आहे की, यात घर काम करणारे, वाहन चालक, माळी यांना पीएफचा फायदा मिळावा. यासाठी सवलत देण्यात येणार आहे. एक व्यक्ती म्हणून त्याचे EPFO मध्ये नोंदणी होऊ शकते आणि ते आवश्यक आहे. तसेच ते जेथे काम करतात तेथील मालक देखील त्यांची PF ची रक्कम स्वत: जमा करु शकतात. त्याची प्रक्रिया काय असेल, त्याची नोंदणी कशी करायची. या संबंधित प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत.

दुसरा प्रस्ताव –
कंट्रीब्युशनमध्ये देखील एक बदल करण्यात आला आहे, या विभागात कामगारांना एक पर्याय देण्यात आला आहे की, पीएफ मध्ये 12 टक्के मॅनडेट्री कंट्रीब्युशन कर्मचाऱ्यांकडून देण्यात येते. याला पर्याय असेल की ते कमी रक्कम देखील जमा करु शकतात जेणे करुन त्यांचा पगार वाढेल.

तिसरा प्रस्ताव –
कर्मचाऱ्याला हा पर्याय असेल की, ते NPS किंवा EPF योजनेतून एक योजना निवडू शकतात. परंतू याला कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे आणि सांगितले की या प्रकारचा पर्याय कर्मचाऱ्यांना देण्यात येऊ नये. कारण हे सोशल सिक्युरिटीच्या विरोधात आहे आणि याने कर्मचाऱ्यांच्या हितांचे नुकसान होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.