LoC च्या जवळ असलेले सर्व लाँच पॅड दहशतवाद्यांनी भरलेले, घुसखोरीसाठी प्रयत्नशील : भारतीय सैन्य

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 –   जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तान सतत भारताविरूद्ध कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. परंतु जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय सुरक्षा दलाच्या तत्परतेमुळे पाकिस्तानला त्यांच्या योजनांमध्ये यश मिळवता आले नाही. पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे भारतीय लष्कराने आज सांगितले. लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन, आर्मीचे नॉर्दन कमांडचे चीफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे डीजी, मुनीर खान यांनी श्रीनगर येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

सैन्याने सांगितले की पाकिस्तानकडून दररोज घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. आम्ही दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे, हे दोघेही लष्करशी संबंधित आहेत. पत्रकार परिषदेत सैन्याने दहशतवाद्यांच्या कबुलीचा व्हिडिओही दाखवला. या व्हिडिओमध्ये दहशतवादी हल्ल्याबद्दल सांगत आहेत. लष्कराने सांगितले की पीओके मध्ये पाकिस्तानच्या सर्व लॉन्चिंग पॅडमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी घुसखोरीत आहेत.

लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन, आर्मीचे नॉर्दन कमांडचे चीफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे डीजी, मुनीर खान यांनी श्रीनगर येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

सैन्याने सांगितले की पाकिस्तानकडून दररोज घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन म्हणाले की, ‘जास्तीत जास्त अतिरेकी घुसखोरी करण्यासाठी आणि काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्याच्या तयारीत आहेत. 21 ऑगस्ट रोजी आम्ही दोन पाकिस्तानी नागरिकांना पकडले जे लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत.

लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन म्हणाले की, राजौरी येथेही पुंछमध्ये घुसखोरीचे प्रयत्न झाले. सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. पकडलेल्या दहशतवाद्यांविषयी आम्ही डीजीएमओ पाक यांनाही माहिती दिली आहे. लष्कराने सांगितले की गुलमर्गमध्येही शांतता आहे. कोठेही हिंसक घटनांची नोंद नाही. आपण लोक देखील जाऊन गुलमर्गमधील परिस्थिती पाहू शकता.

आम्ही दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे, पत्रकार परिषदेत सैन्याने दहशतवाद्यांच्या कबुलीचा व्हिडिओही दाखवला. या व्हिडिओमध्ये दहशतवादी हल्ल्याबद्दल सांगत आहेत. लष्कराने सांगितले की पीओके मध्ये पाकिस्तानच्या सर्व लॉन्चिंग पॅडमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी घुसखोरीत आहेत.

त्याच वेळी, जम्मू-काश्मीर पोलिसांचे एडीजी (कायदा व सुव्यवस्था), मुनीर खान म्हणाले, ‘5 ऑगस्टपासून कोणतीही नागरी दुर्घटना झालेली नाही. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली आहे. हळूहळू परिस्थिती सामान्य होत आहे ‘

Leave A Reply

Your email address will not be published.