आलिया – रणबीरचे ‘सुम’मध्ये ‘शुभमंगल’ ?

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – रणबीर आणि आलिया भट्ट यांच्यातील अफेअरविषयी बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. ते एकमेकांना पसंत करीत असल्याचे व दोघांच्या कुटुंबियांनाही ते पसंत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्याबाबत ते दोघेही काहीही लपवून ठेवताना दिसत नाहीत. असे असताना त्यांनी आपले शुभमंगल सर्वांपासून लपून ठेवत लग्न केल्याची चर्चा सुरु झाली आहे. याला ठरले ते म्हणजे त्यांचा लग्नचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात दोघेही एकमेकांसमवेत जास्तीत जास्त काळ एकत्र घालवत आहेत. अशावेळी त्यांच्या या व्हायरल फोटोमुळे त्यांची चर्चा रंगू लागली आहे. या फोटोमध्ये दोघेही वधू वराच्या वेशभुषेत दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो खंरच आलिया -रणबीरच्या लग्न सोहळ्यातील आहे का? असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. तर काही जणांचे म्हणणे आहे की, फोटो शॉपचे हे एक उदाहरण आहे. या दोन्ही कलाकारांच्या फॅनपेजवरुन तो शेअर करण्यात आला आहे. आगामी जाहिरातीसाठी या दोघांनी एकत्र काम केल्याचे म्हटले जात आहे. त्यातीलच हा फोटो असल्याचे समजते. त्यामुळे कारण काहीही असो, आलिया आणि रणबीर यांच्या विवाह सोहळ्याची आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.