Pune Crime News | डोक्यात दगड घातल्याने पोलीस कर्मचारी गंभीर जखमी ! कवटी फुटल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरु; पुण्यातील घटना, भारतीय सैन्य दलातील जवानाला अटक

दीड महिन्यापूर्वी कारवाई दरम्यान झाला होता वाद

0

पुणे :  Pune Crime News | वाहतुकीचे नियमन करत असताना पोलिस अंमलदार यांनी ट्रिपल जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केल्याने बाचाबाची झाली होती (Pune Traffic Police). कारवाई केल्याचा राग मनात धरून पोलीस अंमलदाराच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले. रमेश ढावरे (Police Ramesh Dhavre) असे जखमी झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ढावरे यांच्या डोक्याची कवटी फुटली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. ही घटना बुधवारी (दि.25) रात्री सातच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ घडली. ढावरे यांनी दीड महिन्यापूर्वी आरोपीवर दंडाची कारवाई केली होती. (Pune Crime News)

 

याबाबत फरासखाना वाहतुक विभागाचे पोलीस कर्मचारी पंकज शंकर भोपळे Pankaj Shankar Bhople (वय-36) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी वैभव संभाजी मनगटे Vaibhav Sambhaji Mangte (ता. सिल्लोड जि. छ. संभाजीनगर) याच्यावर आयपीसी 307, 333, 353 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी वैभव मनगटे हा भारतीय सैन्य दलात नेमणुकीस आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पंकज भोपळे जखमी रमेश ढावरे व इतर पोलीस कर्मचारी श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ वाहतुकीचे नियमन करत होते. पोलीस अंमलदार रमेश ढावरे यांनी आरोपी वैभव मनगटे याच्यावर दीड महिन्यापूर्वी ट्रिपल सिट गाडी चालवल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती.

आरोपी वैभव मनगटे याने बाचाबाचीचा राग मनात धरुन त्याने बदला घेण्याच्या उद्देशाने रमेश ढावरे यांचा शोध घेतला.
बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ढावरे हे बुधवार चौकात वाहतुकीचे नियमन करत होते.
त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने ढावरे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने सिमेंटचा ब्लॉक ढारे यांच्या डोक्यात
जोरात मारला. यामध्ये ढावरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
रमेश ढावरे यांच्या डोक्याची कवटी फुटली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभंग करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.