सावधान ! चुकीच्‍या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्‍टी

message
31st August 2019

एन पी न्यूज २४ ऑनलाइन टीम – एका तरूणाचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याच्या पायाला प्लास्टर करण्यात आले. नंतर हे प्लास्टर काढण्यात आले. वेदना होत असल्याने त्याने आईला मॉलिश करण्यास सांगितले. आईने अर्धातास मालिश केली. त्यानंतर त्यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दवाखान्यात नेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. याबाबत डॉक्टरांनी सांगितले की, जास्त दिवस एखाद्या अंगामध्ये हालचाल होत नसेल तर नसांमध्ये रक्त जमा (ब्लड क्लॉट्स) होऊ शकते. अशा वेळी मालिश केली तर हे क्लॉटिंग रक्ताच्या माध्यमातून लंग्समध्ये जातात. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊन मृत्यू होऊ शकतो. मेडिको लीगल जर्नलमध्ये काही दिवसांपूर्वी यासंबंधिचा अहवाल प्रकाशित झाला होता. म्हणूनच मसाज करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती घेवूयात.

अशी घ्या काळजी

१ गुडघ्या खाली दुखापत असेल तर मालिश करू नये. सॉफ्ट टिश्यू इंज्यूरी असल्यास बर्फाने शेकावे.

२ खुप जास्त गाठी आणि स्वेलिंग नसल्याची खात्री करा. स्वेलिंग, रेडनेस, टाइट लम्प असल्यास मसाज करू नका.

३ प्लास्टर कापल्यानंतर एखाद्या ठिकाणी स्वेलिंग अथवा गाठ असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेवून कलर डॉपलर टेस्ट करा.
४ हाड मोडले असेल, पाठीत वेदना होत असतील, ताप असेल तर मसाज करू नये.

५ मुका मार असेल तर बर्फाने शेकवा. तरीही त्रास होत असेल तर डॉक्टरकडे जा.