पिस्‍ता खाल्‍ल्‍याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्‍या असेच ६ फायदे

0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सर्वच ड्राय फ्रूट्स आरोग्यासाठी लाभदायक आहेत. यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात. यापैकीच एक पिस्ता आहे. मधल्या वेळी भूक लागल्यास मूठभर पिस्ता खावेत. आरोग्यासाठी हे खुप फायदेशीर असते. पिस्तामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. पिस्ता नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो.

पिस्ता खाण्याचे फायदे

१ कॅलरीज न वाढवता पोट भरण्यासाठी पिस्ता हा चांगला पर्याय आहे. पिस्तामुळे पोट भरलेले राहते. यामुळे वजन कमी होते.

२ मुठभर पिस्ता खाल्ल्याने पचन व्यवस्थित होते.

३ हिमोग्लोबिन वाढते. तसेच शरीराच्या विविध अवयवांना ऑक्सिजन मिळतो.

४ पिस्ता खाणे त्वचेसाठी फायदेशिर आहे. यामुळे स्किन कँसरला आळा बसतो.

५ डोळ्यांच्या विविध आजारांपासून रक्षण होते.

६ यातील व्हिटॅमिन बी६ मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.