Pune Cyber Crime News | पुणे : फसवणुकीचे सत्र सुरुच, सायबर गुन्हेगारांकडून 5 जणांची 57 लाखांची फसवणूक

0

पुणे : – Pune Cyber Crime News | पुण्यामध्ये सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक (Cheating Fraud Case) करण्याचे सत्र सुरुच आहे. शहरातील पाच जणांची तब्बल 56 लाख 89 हजार रुपयांची फसणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उत्तमनगर (Uttam Nagar Police Station), सिंहगड रोड (Sinhagad Road Police Station), चतु:श्रृंगी (Chaturshringi Police Station), कोंढवा (Kondhwa Police Station), हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) आयटी अॅक्ट नुसार (IT Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंद पॉलिसीचे पैसे देण्याच्या बहाण्याने फसवणूक

बंद पॉलिसी मधील पैसे काढून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची 5 लाख 50 हजार 499 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी शिवदास शालीकराम मोरे (वय-42 रा. कोंढवे-धावडे, उत्तमनगर, पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 4 मे ते 9 मे 2024 या कालावधी ऑनलाईन घडला आहे. सायबर गुन्हेगाराने मोरे यांना संपर्क करुन तुम्ही 2013 मध्ये काढलेली मॅक्स लाईफ पॉलिसी बंद झाली असून त्यात 1 लाख 84 हजार रुपये जमा असल्याचे सांगून ते काढायचे असतील तर वरिष्ठांशी बोलावं लागेल असे सांगितले. यानंतर मोरे यांचा मोबाईल हॅक करुन त्यांची माहिती घेऊन 4 लाख 92 हजार 997 रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे कदम करीत आहेत.

स्वस्त मोबाईल पडला महागात

कमी किंमतीत मोबाईल मिळवून देण्याच्या आमिषाने एका तरुणीची 70 हजार 999 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी नऱ्हे येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 29 ते 31 जानेवारी दरम्यान घडला आहे. तरुणी मोबाईलवर इन्स्टाग्रामवर रिल पहात असताना नवीन मोबाईल कमी किमतीत विक्रीस असल्याचे सायबर गुन्हेगारांनी भासवले. तरुणीचा विश्वास संपादन करुन तिला बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर तरुणीला मोबाईल न देता फसवणूक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे निळकंठ जगताप करीत आहेत.

टास्कच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

टास्क पूर्ण केल्यानंतर चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून कोंढवा येथील एका 33 वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी 3 लाख 70 हजार 460 रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार 29 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे करीत आहेत.

ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

अनोळखी मोबाईल धारकाने एका ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवली. त्यावर क्लिक केले असता ज्येष्ठ नागरिकाला ग्रुपमध्ये जॉईन करुन घेतले. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुक करुन अधिक मोबदला देतो असे सांगून वेगवेगळे शेअर खरेदी करण्यास भाग पाडून 8 लाख 40 हजार रुपायांची फसवणूक केली. याप्रकरणी सुबोध जिंदाल (वय-57 रा. बालेवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे करीत आहेत.

वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने फसवणूक

वर्क फ्रॉम होम देण्याच्या बहाण्याने हडपसर भागातील गोंधळेनगर येथे राहणाऱ्या प्रद्युम्न कुमार अग्नीहोत्री (वय-38) यांची 38 लाख 57 हजार 267 रुपयांची फसवणूक केली. फिर्यादी यांना हॉटेल बुकिंगचे काम देऊन आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 21 डिसेंबर 2023 ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक गुन्हे मंगल मोढवे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.