Swargate Pune Crime News | पुणे: प्रवासी महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला गजाआड, साडेतीन लाखांचा ऐवज जप्त

0

पुणे : – Swargate Pune Crime News | स्वारगेट एसटी स्टँड व पीएमपीएमएल बस स्टँड (PMPML Bus Stand Swargate) परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांकडील दागिने लांबविणाऱ्या दोन महिला चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) अटक केली. चोरट्यांकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून साडेतीन लाखांचे 50 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई स्वारगेट एसटी स्टँडमध्ये करण्यात आली.

स्वारगेट एसटी स्टँड व पीएमपीएमएल बस स्टँड परिसरामध्ये चोरटे प्रवासी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन त्यांचे सोन्याचे दागिने चोरी करत असल्याच्या घटना वारंवार घडत आहे. त्याअनुषंगाने तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपास पथकातील पोलीस अंमलदार सुजय पवार व संदीप घुले यांनी स्वारगेट एसटी स्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण द्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे एसटी स्टँड परिसरात सातत्याने पेट्रोलींग केले.

दरम्यान, त्यांना माहिती मिळाली की, दोन संशयित महिला एसटी स्टँडमध्ये फिरत आहेत. त्यानुसार तपास पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी दोन महिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत स्वारगेट पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून 50 ग्रॅम वजनाचे साडे तीन लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक गुन्हे गीता बागवडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार संदीप घुले, सुजय पवार, हर्षल शिंदे, रमेश चव्हाण, प्रविण गोडसे, अनिस शेख, शिवा गायकवाड, फिरोज शेख, दिपक खेंदाड, महिला पोलीस अंमलदार स्मिता सिताप, सुनिता घामगळ यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.