Koregaon Park Pune Crime News | कोरेगाव पार्क: बलात्काराची तक्रार देण्यास गेलीस तर मारून टाकीन

0

पुणे : Koregaon Park Pune Crime News | कोणत्याही पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार देण्यास गेलीस तर तुला मारून टाकीन अशी धमकी देणाऱ्या एकावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) बलात्कार (Rape Case Pune) तसेच धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष उर्फ पप्पू पाटोळे Ashish alias Pappu Patole (२४, रा. अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका वीस वर्षीय तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पाटोळे याने तरुणीशी ओळख वाढवून तिला लग्नाचे अमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्यावर कोरेगाव पार्क तसेच अहमदनगर येथे बलात्कार केला. नंतर लग्नास नकार दिला. हा प्रकार मे ते जून २०२४ दरम्यान घडला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगोले या करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.