Pune Cyber Crime News | पुणे: सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगून तरुणीला लाखोंचा गंडा

0

पुणे : Pune Cyber Crime News | सीबीआय अधिकारी (CBI Officer) बोलत असल्याचे सांगून मनी लाँड्रिंग प्रकरणातील (Money Laundering Case) नरेश गोयल गुन्ह्यात सहभाग असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) एका तरुणीची दोन लाख 20 हजार रुपयांची फसवणूक (Online Cheating Fraud Case) केली. हा प्रकार 7 मे 2024 ते 19 जून 2024 या कालावधीत तरुणीच्या राहत्या घरी ऑनलाइन घडला आहे.

याबाबत मगरपट्टा (Magarpatta) येथे राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि.19) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्याविरुद्ध आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने फिर्यादी तरुणीशी संपर्क करुन टेलीकॉम विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या मोबाईल क्रमांकावर अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली आहे. तुमचा नंबर बंद होणार असल्याचे सांगून तपास अधिकारी फोनवर बोलतील असे सांगितले.

त्यानंतर व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल द्वारे प्रदिप सावंत व राजेश मिश्रा हे सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचा आधार कार्ड क्रमांकावरुन तुम्ही नरेश गोयल (जेट एअरवेजचे संस्थापक, यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे) यांच्याशी संबंधित गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तुम्हाला यातून वाचाचे असेल तर हिमांशु मार्केटींग च्या नावावर असलेल्या बँक खात्यावर 2 लाख 20 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. त्यानुसार तरुणीने पैसे पाठवले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे उमेश गित्ते करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.