Vadgaon Sheri Pune Crime News | शहरात कोयता गँगचा पुन्हा धुमाकूळ; पोलिसांच्या गाडीसह इतर वाहनांची तोडफोड

0

पुणे : Vadgaon Sheri Pune Crime News | कोयता गँगच्या (Koyta Gang) विरोधात पुणे पोलिसांच्या (Pune Police) धडक कारवाया सुरु आहेत. या गँगचा म्होरक्यासह अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. काही जणांवर मकोका लावण्यात आला आहे. काही जणांना हद्दपार करण्यात आले आहे. कोयताची विक्री करताना आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. या सर्व उपायानंतरही आता पुन्हा आधारकार्डने डोके वर काढले आहे.

शहरात कोयता गँगने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. कारसह दुचाकी वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कोयता गँगने केला आहे. वडगावशेरीच्या गणेशनगर (Ganesh Nagar Vadgaon Sheri) परिसरात काल कोयता टोळीच्या गुंडाने धुमाकूळ घालत हातामध्ये कोयते आणि दगड घेत पोलिसांच्या गाडीसह १५ ते २० वाहनांची तोडफोड केली. यामध्ये सहा कार ,चार रिक्षा, तीन दुचाकी आणि इतर वाहनांची कोयता गॅंग ने तोडफोड केली. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

सलग पुण्यात दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाल्याने पोलिसांचा धाक उरला की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. कालच सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी या ठिकाणी कोयता टोळीने धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर मध्यरात्री चंदननगर परिसरातील वडगावशेरीत वाहनांची कोयता टोळीने तोडफोड केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पुणे शहरातील अनेक भागात तरुणांच्या टोळ्या हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. खंडणी वसूल करणे, धमकावणे, दहशत निर्माण करण्यासाठी शहरातील अनेक भागात हे तरुण हातात कोयते घेऊन फिरताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीती आहेच शिवाय व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.