Pune Crime Branch | बकोरी डोंगराजवळील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, चार चाकी वाहनासह मोठी दारू जप्त

0

शिक्रापूर – (सचिन धुमाळ) : Pune Crime Branch | पुणे शहर पोलीस दलाच्या हद्दीतील वाघोली जवळील बकोरी डोंगराजवळील दारु अड्डा गुन्हे शाखा युनिट-६ कडून उध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईत एका चारचाकी सह ७७० लिटर गावठी हातभट्टीची दारु असा एकूण २ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी दिली.

याप्रकरणी कपिल शिवाली येलुरे (वय ३०), प्रदीप गुलाब मुजमुले (वय २७, दोघे रा. कोलते पाटील, आयव्ही इस्टेटजवळ, ड्रीम संकल्प सोसायटी रोड, वाघोली, पुणे) व बाळु कटके (रा. कटकेवाडी, वाघोली, पुणे) यांना अटक केली आहे.

याबाबत मिळालेली माहितीनुसार गुन्हे शाखेचे पथक हद्दीमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सुचनेप्रमाणे अवैध धंदे प्रतिबंधात्मक कारवाई कामी पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील पोलीस अंमलदार रमेश मेमाणे व नितीन धाडगे यांना खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की बकोरी रोड, वाघोली येथे डोंगराजवळ स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता काही इसम अवैधरित्त्या दारु विक्री करत आहेत.

पथकाने सदरची माहिती गुन्हे शाखा युनिट- ६ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांना कळवुन बातमीची खातरजमा करण्यासाठी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी पत्र्याचे शेडमध्ये व मारुती कंपनीच्या सिल्व्हर रंगाच्या वॅगनार कार मधुन कपील येलुरे, प्रदीप मुजमुले व बाळु कटके हे अवैधरित्या दारु विक्री करत असताना मिळुन आल्याने त्यांचे कब्जातील ७० हजार रुपये किमतीची ७७० लिटर गावठी हातभट्टीची दारु व २ लाख रुपये किमतीची मारुती कंपनीच्या सिल्व्हर रंगाच्या वॅगनार कार क्रमांक एमएच ०६ एबी ००७० असा एकुण २ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन महाराष्ट्र प्रोव्हिबिशन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस DCP (गुन्हे) अमोल झेंडे, ACP सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.