Firing In Talegaon Dabhade | तळेगाव दाभाडे गोळीबाराने हादरले, जवळपास 4 ठिकाणी फायरींग; 6 जणांच्या टोळक्याची दहशत

0

मावळ : Firing In Talegaon Dabhade | तळेगाव दाभाडे भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि मावळ (Maval) परिसरातील गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी कोयता गँगची (Koyta Gang) दहशत आहे. त्यात आता बाजूच्याच तळेगाव दाभाडे मध्येही फायरींग करणाऱ्या टोळक्याची दहशत पाहायला मिळाली आहे.

गुरूवारी रात्री साडे आठच्या सुमारास दोन दुचाकी शहरात घुसल्या. प्रत्येक दुचाकीवर तिघेजण बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते. तर हातात पिस्तुल होती. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत या टोळक्याने दहशत माजवली. जवळपास चार ठिकाणी फायरींग केली. शाळा चौक, राजेंद्र चौक, मारुती चौक, गजानन महाराज मंदिराजवळ या टोळक्याने गोळीबार केला.

शहरात असलेल्या शाळा चौक येथे आरोपींनी दोन गोळ्या झाडल्या. उर्वरित तीन ठिकाणी प्रत्येकी एक गोळी झाडली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक तळेगाव दाभाडे शहरात दाखल झाले. त्यांनी घटना स्थळाची पाहणीही केली.

शिवाय स्थानिक पातळीवर सीसीटीव्ही फुटेजही मिळवले त्यात हे टोळके दिसून आले. फायरींग केल्यानंतर हे टोळके फरार झाले आहे. हे नेमके कोण होते हे समजू शकले नाही. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. शिवाय फायरींग करण्याचा त्यांचा उद्देश काय होता हे सुद्धा तपासले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.