Kalyani Nagar Car Accident Pune | अल्पवयीन मुलाला वयाची खातरजमा न करता मद्य पुरवल्याचे निष्पन्न; जामीन अर्जाला विरोध

0

पुणे: Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणीनगर कार अपघाताच्या संदर्भात आणखी एक अपडेट समोर आली आहे. विशाल अगरवाल (Vishal Agarwal) यांच्यासह पबचालक आणि कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात आला आहे. विद्देशेष न्यायाधीच एचआर यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर २१ जून रोजी निर्णय होण्याची अपेक्षा आहे. आरोपींना जामीन झाल्यास ते पुराव्यात छेडछाड करून तपासात अडथळा आणू शकतात असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास दिल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल ( वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) आणि अल्पवयीन मुलाला व त्याच्या मित्रांना मद्य पुरविल्याप्रकरणी ‘कोझी’ पबच्या (Cosie Pub) मालकाचा मुलगा नमन प्रल्हाद भुतडा Naman Pralhad Bhutada (वय २५, रा. ए ७, पद्मविलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर ( वय ३५, रा. साईसदन ए २, तुकाईदर्शन, हडपसर ) आणि ‘ब्लॅक’ पबचा सहायक व्यवस्थापक संदीप रमेश सांगळे वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाइट्स, मुंढवा ), बार काऊंटरचा व्यवस्थापक जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) आणि कर्मचारी नितेश धनेश शेवानी (वय ३४, रा. एनआयबीएम) यांनी जामिनावर मुक्त करण्यासाठी अर्ज केला आहे.

बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. एस. के. जैन (Adv S.K. Jain), अ‍ॅड. सुधीर शहा (Adv Sudhir Shah), अ‍ॅड. अमोल डांगे (Adv Amol Dange) आणि अ‍ॅड. प्रशांत पाटील (Adv Prashant Patil) यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून, आरोपींनी तपासात पूर्णपणे सहकार्य केले आहे. आरोपींवरील कलमे अदखलपात्र असून, त्यांना जामीन देण्यात यावा, असा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला. त्याला विशेष सरकारी वकील विद्या विभूते व तपास अधिकारी गणेश माने यांनी विरोध केला.

Leave A Reply

Your email address will not be published.