Koregaon Park Crime | पुणे : कोरेगाव पार्क भागात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, 3 मुलींची सुटका

पुणे : – Koregaon Park Crime | पुणे शहरातील उच्चभ्रू समजला जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरातील विवा स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या बेकायदा वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश (Prostitution Racket) करण्यात आला आहे. स्पामध्ये काम करण्याच्या नावाखाली नागालँड, पश्चीम बंगाल मधील तरुणींना पुण्यात आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. याप्रकरणी कोरेगाव पोलीसांनी (Koregaon Park Police Station) दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस हवालदार सपना दिलीप जाधव यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दोन महिलांवर आयपीसी 370, 34 सह अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत (पिटा) गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.10) सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क भागातील लेन नं. 7 परिसरातील विवा स्पा येथे करण्यात आली. या कारवाईत नागालँड, पश्चीम बंगाल, पुणे अशा एकूण तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
कोरेगाव परिसरातील हरमेश विलाश बिल्डींगमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या विवा स्पा या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एक बनावट ग्राहक त्या ठिकाणी पाठवून या संपूर्ण प्रकाराची खातरजमा केली आणि या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्यांना तीन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे दिसून आले. या महिलांची पोलिसांनी सुटका केली. आरोपी जास्तीच्या पैशाचे आमिष दाखवून मसाज सेंटरच्या नावाखाली या महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होत्या. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते करीत आहेत.