Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची चौकशी होणार?; बाल न्याय मंडळाला पोलिसांकडून परवानगीसाठी पत्र

0

पुणे: Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणीनगर भागात एका भरघाव पोर्शे कारने (Pune Porsche Car Accident) दुचाकीवर असलेल्या तरुण, तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेत अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीला लगेचच जामीन मिळाल्याने पुणेकरांमधून संताप व्यक्त केला जात होता.

दरम्यान त्यानंतर आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. या प्रकरणात आरोपीचे वडील विशाल अगरवाल (Vishal Agarwal Builder) आणि सुरेंद्र अगरवाल (Surendra Kumar Agarwal) हे कोठडीत आहेत.

या अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेकडून (Pune Crime Branch) अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांकडून त्यासंदर्भात बाल न्याय मंडळाला Juvenile Justice Board (JJB) पत्र पाठवण्यात आले आहे. बाल न्याय मंडळाने परवानगी दिल्यास पुणे पोलिसांना या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची चौकशी करता येणार आहे. (Pune Police Letter To Juvenile Justice Board (JJB)

अल्पवयीन तरुणाचे नातेवाईक किंवा त्याच्या वकिलांच्या उपस्थितीमध्ये ही चौकशी केली जाईल. तपासाच्या दृष्टीने गुन्हे शाखेकडून होणारी ही चौकशी महत्त्वाची ठरू शकते.

आम्ही जेजे बोर्डाला एक पत्र लिहून अल्पवयीन आरोपीविरुद्ध चौकशी करण्याची परवानगी मागितली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.

सध्या या मुलाचे वडील आणि आजोबा कस्टडीमध्ये आहेत, तर आई फरार असल्याची माहिती आहे. त्यामुळे बाल न्याय मंडळाने चौकशीची परवानगी दिल्यास अल्पवयीन आरोपीची चौकशी ही त्याचे वकील किंवा दुसऱ्या नातेवाईकांसमोर होऊ शकते अशी माहिती मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.