Sandeep Khardekar On Pubs In Pune | पहाटेपर्यंत सुरु असणाऱ्या हॉटेल्सवर कारवाई करा, संदीप खर्डेकर यांची मागणी

0

पुणे : – Sandeep Khardekar On Pubs In Pune | पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ‘ब्रम्हा’चे संचालक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal Builder) यांच्या अल्पवयीन मुलाने रविवारी (दि.19) मध्यरात्री आपल्या भरधाव कारने दोघांना चिरडले. या अपघातानंतर पुण्यात पहाटे पर्यंत सुरु असणाऱ्या हॉटेल्सचा विषय ऐरणीवर आला आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांना निवेदन देऊन पहाटे पर्य़ंत सुरु राहणाऱ्या खाद्य पेय दुकानांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुण्यातील नाईट लाईफ बाबत ची चर्चा सध्या सर्वत्र सुरु असून केवळ पब संस्कृतीच नव्हे तर रस्त्यावर किंवा काही प्रमुख चौकांमध्ये देखील “रात्रीस खेळ चाले” अशी परिस्थिती आहे. नळस्टॉप चौकातील खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल व हातगाड्यांबद्दल तेथील नागरिक तक्रार करून दमले. नळस्टॉप चौकातील सर्वदर्शन सोसायटी ने तर सर्वत्र अर्ज केलेत. कोणतेही एन ओ सी दिले नसताना त्यांच्या येथे पहाटे पर्यंत तरुण तरुणींचा धिंगाणा आपण इंस्टाग्राम वर पण बघू शकतो.

त्यात भर की काय म्हणून पुढे एस एन डी टी कॉलेज समोर असलेल्या मेट्रो स्टेशन समोर आता एक खाऊ गल्ली सुरु होतं असून तेथे 24×7 चा फलक लागला आहे. अश्या सर्व प्रकरणात आता पोलीस आणि मनपा ने संयुक्त कारवाई करणे गरजेचे असून हा केवळ पुण्याची संस्कृती रक्षणाचा विषय नसून भावी पिढीला विनाशापासून वाचविण्यासाठी आता कठोर कारवाई करावी अशी मागणी संदीप खर्डेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.