Sharad Pawar On Ajit Pawar-Eknath Shinde | ‘अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षासाठी ‘ही’ धोक्याची घंटा”, शरद पवार यांचे भाजपाबाबत मोठे वक्तव्य

0

मुंबई : Sharad Pawar On Ajit Pawar-Eknath Shinde | भाजपाला एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती. आता भाजपाचा मोठा विस्तार झाला आहे. भाजपा स्वतःचा कारभार करण्यास सक्षम आहे, असे भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे. भाजपा जर संघाबाबत असे म्हणत असेल तर भविष्यात राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या दोन पक्षांना ही धोक्याची घंटा आहे. ज्या दिवशी गरज संपेल तेव्हा, या दोन्ही पक्षांबाबत अशीच भूमिका भाजपा घेऊ शकते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले.

मोदींवर टीका करताना शरद पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी प्रचंड घाबरलेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सभा घेतल्या. ते व्यक्तिगत हल्ले करत आहेत. देशासमोरचे प्रश्न बाजूला ठेवून मला भटकती आत्मा म्हणणे आणि राहुल गांधींचा उल्लेख शहजादा असा करणे हे चुकीचे आहे. हे काही निवडणुकीचे प्रश्न नाहीत.

लोकसभा निवडणुकीचा अंदाज वर्तवताना शरद पवार म्हणाले, पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे चार खासदार आणि काँग्रेसचा एक खासदार आणि एमआयएमचा एक खासदार होता. यावेळी मात्र चित्र वेगळे असेल. प्रत्येकांना यावर्षी उत्तम जागा मिळतील.

लोकांच्या प्रतिक्रियांवरून समजते की, मागच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सोबत मुस्लिम संघटन होते. यावर्षी हे मुस्लिम संघटन त्यांच्यासोबत नाही त्यामुळे यावेळी त्यांची ताकद कमी झाली आहे. त्यांच्या मतांचा टक्का यंदा कमी झालेला पाहायला मिळेल, असे पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, भाजपासोबत जायचे हे आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांचे म्हणणे होते. आपण सत्तेत गेले पाहिजे ही बाब त्यांनी माझ्यापासून लपवून ठेवली नव्हती. मी एक दिवस त्यांचा प्रस्ताव काय आहे तो मागून घेतला, चर्चा केली. पण मी भाजपासोबत जाण्याची भूमिका स्वीकारली नाही. मी त्यांना म्हटले, तुम्ही भाजपासोबत जा मी येऊ शकत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.