Murlidhar Mohol Kasba Rally | ‘मोदीजींचंच नेतृत्व देशाला भारी’ मुरलीधर मोहोळ यांच्या कसब्यातील प्रचारात घुमली आरोळी

0

पुणे : – Murlidhar Mohol Kasba Rally | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) महायुतीचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ यांना दांडगा प्रतिसाद मिळत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ (Kasba Vidhan Sabha) आणि कँटोन्मेंट मतदारसंघात (Pune Cantonment Vidhan Sabha) सोमवारी एकत्रित रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, कसबा आणि कँटोन्मंट विधानसभा मतदार संघात काढण्यात आलेल्या रॅलीने धम्माल उडवून दिली. एक वेगळाच फील दिला. शहराच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या आणि सतत भोवताली गजबजाट असलेल्या या नागरिकांनी रॅलीच्या आगमनानं एक नवचैतन्य अनुभवल्याचं आज पाहायला मिळालं.

सारेच उत्साहानं गॅलरीत, दारात आणि गाडीजवळ येऊन हात उंचावून प्रोत्साहन देत होते, पाठिंबा दर्शवीत होते. अनेक तरुण-तरुणी आणि बंधू-भगिनी रस्त्यावर उतरून जोश वाढवित होत्या. काहींची भेटण्याची, तर काहींची सोबत सेल्फी काढून घेण्याची लगबग होती. हे सारं अनुभवताना हे केवळ मतदार नाहीत, तर ही आपली माणसं आहेत, यांच्यासाठी आपल्याला सातत्यानं जागरूक राहावं लागणार आहे, ही भावना प्रबळ होत होती. त्याच भावनेनं त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे हात बळकट करण्यासाठी पाठीशी उभे राहण्याची विनंती केल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती (Kasba Ganpati Arti) करुन आणि आशीर्वाद घेऊन प्रारंभ झालेली ही रॅली त्वष्टा कासार पवळे चौक, पुण्येश्वर भोईराज विठ्ठल मंदिर, शिंपी आळी, व्यवहार आळी, फडके हौद, आरसीएम कॉलेज, भारतमाता मंडळ, श्रमिकनगर, इंदिरानगर, भीमनगर, गोसावीपुरा, काळा वाडा, शनी-मारुती मंदिर, त्रिशुंडा गणपती, विक्रम मंडळ, औदुंबर मंडळ, दारूवाला पूल गणपती, श्रीयाळशेठ चौक, दीन बंधू चौक, स्वामीनारायण मंदिर, इंडियन बँक, निवडुंग्या विठोबा चौक, नाना चावडी चौक, डुल्या मारुती, दारूवाला पूल, सातववाडा, आंदेकर चौक, डोके तालीम, साखळीपीर तालीम, हिंदमाता चौक, पालखी विठोबा चौक, गोविंद हलवाई चौक, ढोर गल्ली, गोविंद हलवाई चौक, बोहरी आळी, सोन्या मारुती चौक, फडके हौद, तपकीर गल्ली या परिसरात मतदारांना भेटत गेली व रामेश्वर चौकात तिचा समारोप झाला.

या रॅलीत कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble), हेमंत रासने (Hemant Rasane), माजी सभागृह नेते गणेश बीडकर (Ganesh Bidkar) यांच्यासह महायुतीचे नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.