Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांनी दिले चोख प्रत्युत्तर, ”शरद पवार मुद्दाम आजारी पडले, हा अजितदादांचा विचार हास्यास्पद”

0

पुणे : Rohit Pawar On Ajit Pawar | अजित पवार प्रचारासाठी कुठे होते तर सोसासटी, गल्ली आणि गावांमध्ये. त्याठिकाणी अजितदादांना कदाचित आरामही मिळाला असेल. पण शरद पवारांना कुठे आराम मिळाला? त्यामुळे शरद पवार मुद्दाम आजारी पडले, असे अजित पवारांना वाटत असेल तर त्यांचा विचार हास्यास्पद आहे. हे बदललेले अजित पवार कोणालाही ओळखू न येणारे आहेत, असे प्रत्युत्तर रोहित पवार यांनी अजित पवारांना दिले आहे. (Sharad Pawar Illness)

रोहित पवार म्हणाले, शरद पवार यांनी गेल्या २० दिवसांमध्ये ५२ सभा घेतल्या. कधी एका दिवसात तीन सभा घेतल्या, दिवसाला २५ बैठका घेतल्या. फक्त चार तासांची झोप त्यांना मिळायची, ते ८४ वर्षांचे आहेत. (Sharad Pawar Health)

सतत मी विकास केला असे म्हणत असलेल्या अजित पवारांवर टीका करताना रोहित पवार म्हणाले, २०१४ पर्यंत जर शरद पवारांनी सत्ताच मिळवून दिली नसती तर अजित पवारांना पद कसे मिळाले असते, मग त्यांनी विकास कसा केला असता? त्यामुळे विकास कोणी केला, हे सर्वांना माहिती आहे. दादांना अहंकार आणि मीपणा आला आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

दत्ता भरणे (Dattatray Bharne) शिवीगाळ प्रकरणावर रोहित पवार म्हणाले, दत्ता भरणे यांनी शिवीगाळ केलेला व्यक्ती बारामती ॲग्रोचा कर्मचारी आहे. परंतु तो तिथेच राहतो. दत्ता भरणे जर त्या कर्मचाऱ्यावर आरोप करत असतील तर तसे व्हिडिओ दाखवा, पुरावे दाखवा. अजितदादांनीच हजारो कार्यकर्ते, कारखान्याचे कर्मचारी बाहेरून आणले आहेत.

ते पुढे म्हणाले, दत्तामामा खोटे बोलतात. स्वतः आई बहिणीवर शिव्या देतात. आम्ही तो व्हिडिओसुद्धा दिला आहे. बारामतीमध्ये सध्या टेन्स वातावरण आहे. बुथवर ताबा मारण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो, अशी तक्रार आम्ही दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.