Amol Kolhe On Ajit Pawar | बारामतीच्या मैदानात अमोल कोल्हेंची चौफेर फटकेबाजी, अजितदादा आपसे बैर नहीं…लेकिन बीजेपी…

0

बारामती : Amol Kolhe On Ajit Pawar | घड्याळाला मत म्हणजे भाजपला मत, हे जनतेला कळून चुकलंय, त्यांना मतं कसं द्यायचं? आज ते जात्यात असतील तर आपण सुपात आहोत. अजितदादा आपसे बैर नहीं…लेकिन बीजेपी तेरी खेर नहीं…अशी जोरदार फटकेबाजी खासदार अमोल कोल्हे यांनी बारामतीच्या मैदानात केली. बारामती लोकसभा निवडणुकीच्या (Baramati Lok Sabha) प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचा विजयाची सभा असा उल्लेख कोल्हे यांनी केला.

सभेत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, ७ तारखेला मतदान करायला जाताना नरेंद्र मोदींनी २०१४ ला सांगितल्याप्रमाणे घरातल्या गॅस सिलेंडरला ३ वेळा नमस्कार करून जा, शेतकऱ्यांना आठवून जा, बेरोजगार तरुणांचा चेहरा आठवून जा, आणि ३ नंबरचे बटन दाबून ३ लाखांच्या मताधिक्याने सुप्रिया सुळे यांना निवडून द्या.

अजित पवारांवर निशाणा साधताना अमोल कोल्हे म्हणाले, सभेची जागा काढू घेऊ शकाल, पण बारामतीच्या काळजातली जागा कुणाला आहे? हे ही गर्दी दाखवून देत आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो, सुप्रिया सुळे यांच्या सभेला येण्याचे भाग्य मला मिळाले. सुप्रिया सुळे संसदेत बोलायला लागल्यावर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो.

तर अजित पवारांवर निशाणा साधताना अमोल कोल्हे पुढे म्हणाले, शरद पवारांचा डोक्यावर हात असल्यावर काय होऊ शकते, मला पाडण्याची भाषा करणारा अजून बारामतीमधून बाहेर पडू शकलेला नाही. सर्व सामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे. परत जर तुम्हाला कुणाचा फोन आला तर, एकदा सांगितले ना तुला…, असे म्हणा. असे म्हणत कोल्हे यांनी अजित पवारांची नक्कल केली.

भटकती आत्मा, अशी टीका नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) शरद पवार यांच्यावर केली होती. यावरून अमोल कोल्हे म्हणाले, आज मी अभिमानाने सांगतो पवार साहेब महाराष्ट्राचा आत्मा आहेत. हा महाराष्ट्राचा आत्मा ५५ वर्ष हिंदुस्थानच्या आत्मसन्मानासाठी जगत आहे. आजीनी सांगितले चोरीची गोष्ट कधी टिकत नसते, असे म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर निशाणा साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.