Chandan Nagar Pune Crime | पुणे : फेसबुकवरील मैत्री महागात, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

0

पुणे : – Chandan Nagar Pune Crime | फेसबुकवर मैत्री (Facebook Friend) करुन तरुणीला प्रपोज केले. दोन वर्षे तिच्यासोबत रिलेशनमध्ये (Live In Relationship) राहून तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. मात्र, लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करुन लग्नास नकार दिला. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) एका व्यक्तीवर बलात्कार (Rape Case Pune) व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत (Atrocity Act) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 31 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरून शिवराज सुभाषराव उंबरकर Shivraj Subhasrao Umbarkar (रा. देवगाव, अंजनगाव, अमरावती) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन सह अॅट्रोसीटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल 2022 ते जानेवारी 2024 या कालावधीत चंदननगर आणि पीडित तरुणीच्या रुममध्ये घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी तरुणीची एप्रिल 2022 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. आरोपीने मुलीसोबत मैत्री करुन प्रेमसंबंध ठेवले. शिवाराज याने तरुणीला तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे आमिष दाखवले. त्यानंतर दोघेजण रिलेशनमध्ये राहू लागले. रिलेशनमध्ये असताना आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, फिर्य़ादी यांनी शिवराज याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लग्न करण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी शिवराज उंबरकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त अश्वीनी राख (ACP Ashwini Rakh) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.