Baner Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार, जातीवाचक शिवीगाळ करुन लग्नास नकार; 4 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

0

पुणे : Baner Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तरुणीवर वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. मात्र, तरुणीने लग्नाबाबत प्रियकराला आणि त्याच्या घरच्यांना विचारले असता तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे (Rape Case Pune). याप्रकरणी प्रियकर व त्याच्या कुटुंबातील व्यक्तींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा (Atrocity Act) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत गोखलेनगर, बाणेर परिसरात घडला आहे.

याप्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून येथील 27 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि.12) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून ऋषिकेश प्रदीप आव्हाड Rishikesh Pradeep Awhad (रा. मजले चिंचोली, आव्हाडवाडी, ता.जि. नगर), त्याची आई, मावस भाऊ आणि बहिण यांच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, सह अनुसुचित जाती अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषिकेश याने पिडीत मुलीसोबत मैत्री करुन तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर पिडीत तरुणीला पुण्यातील गोखलेनगर, बाणेर परिसरात नेऊन तिच्यासोबत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादी यांनी ऋषिकेश याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली. त्यामुळे पिडीत मुलीने ऋषिकेश याच्या घरच्यांकडे लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी ऋषीकेशच्या आई, मावस बहिण यांनी तिला जातीवाचक शिवीगाळ केली. तर ऋषिकेश याने मी स्वत: गळफास घेऊन आत्महत्या करतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास खडकी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.