Lonikand Pune Crime News | पुणे : तरुणीला बलात्काराची धमकी, तरुणावर गुन्हा दाखल

18th June 2024

पुणे : – Lonikand Pune Crime News | तरुणीच्या घराबाहेर येऊन जोरात दरवाजा वाजवून दार उघडण्यास सांगितले. मात्र, तरुणीने दार उघडण्यास नकार दिल्याने तरुणाने बलात्कार (Rape Case Pune) करण्याची धमकी दिल्याचा प्रकार वाघोली परिसरात घडला आहे. हा प्रकार रविवारी (दि.16) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 27 वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन आकाश जाधव (रा. वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या घरमालकाचा मुलगा आहे. रविवारी दुपारी फिर्यादी घरात झोपल्या असताना आरोपीने घराचा दरवाजा जोरात वाजवून दार उघण्यास सांगितले. मात्र, फिर्य़ादी यांनी त्याला नकार दिला.

दरम्यान, फिर्य़ादी यांनी आरोपीच्या आईला फोन करुन हा प्रकार सांगत असताना आरोपीने अश्लील शिवीगाळ केली. तसेच बलात्कार करण्याची धमकी देऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे भाष्य केले. फिर्यादी यांनी आरोपीच्या आईला हा प्रकार सांगितल्यानंतर त्याने आईसमोर पुन्हा बलात्कार करण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.