Gangapur Nashik Crime News | नाशिक : सराईत गुन्हेगारांचा पाठलाग करुन पिस्टल जप्त, गंगापुर पोलिसांची कारवाई (Video)

नाशिक : – Gangapur Nashik Crime News | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) अनुषंगाने शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी (दि.18) रात्री गंगापूर पोलसांनी (Gangapur Nashik Police) चार सराईत गुन्हेगारांचा पाठलाग करुन त्यांच्याकडून गावठी कट्टा व काडतुस जप्त केले. ही कारवाई रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास एस.एस.टी. पॉईंट गंगापुर गाव जकात नाक्याजवळ करण्यात आली.
इम्रान अयनुर शेख (वय-25 रा. सातपुर, नाशिक), शेखर दिलीपराव कथले (वय-29 रा. शिवाजीनगर, ता. सेलु जि. परभणी), अरबाझ शब्बीर खान पठाण (वय-23 डिग्रसवाडी, सेलु जि. परभणी), राहुल शाम क्षत्रिय (वय-24 रा. नांदुरनाका, नाशिक) यांच्यावर गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस दलातील (Nashik Rural Police) हरसुल पोलीस ठाण्याकडून (Harsul Police Station) गंगापुर पोलिसांना माहिती मिळाली की, एक ग्रे रंगाच्या टोयोटा इनोव्हा कार (एमएच 20 सीए 9595) मधून काही तरुण नाशिकच्या दिशेने येत असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गंगापुर पोलिसांचे पथक गंगापुर जकात नाक्याच्य पुढे थांबले असता रात्री साडेआठच्या सुमारास मिळालेल्या माहितीप्रमाणे एक कार गिरणारे गावाकडून येताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला मात्र, चालकाने गाडी न थांबवता तसाच वेगात निघून गेला. पथकाने त्यांचा पाठलाग करुन एस.एस.टी पॉईंट जवळ गाडी आडवी मारुन आरोपींची गाडी आडवली.
त्यावेळी गाडीत बसलेल्या आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने त्यांना पकडून ताब्यात घेतले. त्यावळी हरसुल पोलीस ठाण्याचे पथक देखील त्याठिकाणी आले. आरोपींची अंगझडती व इनोव्हा कारची झडती घेतली असता कारच्या मधल्य सिटच्या खाली एक गावठी पिस्टल व काडतुस मिळुन आले. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील करीत आहेत.
तपासादरम्यान, आरोपींनी हॉटेल कश्यपी फोर्ट येथे किरकोळ कारणावरुन वाद करुन तेथील हॉटेल मालक व वेटर यांना पिस्टल दाखवून दहशत निर्माण केली होती. तसेच दहशत निर्माण करण्यासाठी सात राऊंड हवेत गोळीबार केले होते. आरोपींवर हरसुल पोलीस ठाण्यात आयपीसी 307, 323, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट, अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. इम्रान शेख याच्यावर अंबड, सेनगांव, अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर शेखर कथले याच्यावर सेलु पोलीस ठाण्यात तीन तसेच राहुल शाम क्षत्रिय याच्यावर आडगांव पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik IPS), पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस अंमलदार रविंद्र मोहिते, गणेश रहेरे, सचिन काळे, सचिन अहिरे, विनायक आव्हाड, मच्छिंद्र वाकचौरे, सुजित जाधव, रमेश गोसावी, सतीश जाधव, अश्विनी खांदवे यांच्या पथकाने केली.