Hadapsar Pune Crime News | पुणे : छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनवर फसवणुकीचा गुन्हा

पुणे : – Hadapsar Pune Crime News | ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी (Cheating Fraud Case) पुण्यातील खराडी परिसरातील छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या (Chatrapati Multistate Co-operative Credit Society) चेअरमनवर फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला आहे. हा प्रकार 1 मार्च 2023 ते 16 मे 2024 या कालावधीत घडला आहे. संतोष भंडारी Santosh Bhandari Chatrapati Multistate (रा. गेवराई, बीड) असे गुन्हा दाखल केलेल्या चेअरमनचे नाव आहे. भंडारी याने गुंतवणुकदार महिलेची तब्बल 11 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली.
याबाबत राजकुमार भजनलाल हेमदेव (वय-64 रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी गुरुवारी (दि.16) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा (Chatrapati Multistate) चेअरमन संतोष भंडारी याच्यावर आयपीसी 406, 409, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांच्या पत्नीने आरोपी संतोष भंडारी याच्या छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या खराडी शाखेत 1 मार्च 2023 रोजी 5 लाख रुपये एक वर्षाच्या मुदतीवर ठेवले होते. मुदत ठेवीवर क्रेडीट सोसायटीने दरसाल दर शेकडा 12 टक्के व्याज दिले होते. त्यानुसार मुदत संपल्यानंतर फिर्यादी यांच्या पत्नीला 5 लाख 60 हजार रुपये व्याजासहीत परत मिळणार होते. मुदत संपल्यानंतर फिर्यादी यांच्या पत्नीने पैशांची मागणी केली. मात्र, अद्याप पर्य़ंत आरोपीने पैसे परत न करता 11 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.