Baramati Pune Crime News | कर्ज माफ करतो म्हणून केली शरीर सुखाची मागणी, नकार देताच गळ्यावर चाकूने वार; बारामती मधील धक्कादायक घटना

0

बारामती : – Baramati Pune Crime News | पुणे जिल्ह्यात रोजच छेडछाडीच्या घटना घडत आहेत. यामध्ये कंपनीत काम करत असलेल्या महिला आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणींचा विनयभंग (Molestation Case) केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यातच धमक्या किंवा इतर कारणांची भीती दाखवून मुलींकडे शरीर सुखाची मागणी (Demand For Body Pleasure) केल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशीच एक घटना बारामती शहरामध्ये घडली आहे. आई-वडीलांना दिलेले कर्ज व उचल स्वरुपात दिलेले पैसे माफ करतो असं सांगत मुलीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीने नकार दिल्यानंतर तिच्या मानेवर व गळ्यावर धारदार चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. (Attempt To Murder)

याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी (Baramati City Police) मळद येथील भय्यावस्ती येथे राहणाऱ्या दत्तात्रय कुंभार याच्यावर पोक्सो (POCSO Act) आणि अॅट्रॉसिटीसह (Atrocity Act) खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 मे 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बारामतीच्या कसबा (Kasba Baramati) भागातील महालक्ष्मी कॉम्प्युटर्स येथे ही घटना घडली. याबाबत जखमी मुलीने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

फिर्यादी मुलीच्या आई-वडिलांना दिलेले कर्ज व उचल स्वरुपात दिलेले पैसे माफ करतो असे सांगत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने त्यास नकार दिला असता आरोपी दत्तात्रय कुंभार याने तिचे तोंड दाबले. तसेच त्याच्या जवळ असलेल्या धारदार चाकूने तिच्या मानेवर व गळ्यावर वार करुन पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. आरोपीने फिर्य़ादी मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी दत्तात्रय कुंभार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, हे सगळं सरु असतानाच मुलीला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर थेट मुलीवर चाकून हल्ला करुन तिच्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हे सर्व पाहून मुलीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने तिच्यासोबत घडेलला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. हा प्रकार पाहून पोलीस देखील हादरुन गेले. त्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन गुन्हा दाखल केला. आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास बारामती पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.