Hinjewadi Pune Crime News | पिंपरी : घरावर दगड मारल्याचा जाब विचारल्याने लोखंडी रॉडने मारहाण, बाप-लेक गजाआड

पिंपरी : – Hinjewadi Pune Crime News | घराच्या पत्र्यावर दगड मारल्याचा जाब विचारला म्हणून वडील आणि मुलाने दोघांना लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले (Attempt To Kill). हा प्रकार मंगळवारी (दि.14) रात्री दहाच्या सुमारास मुळशी तालुक्यातील (Mulshi) नेरे दत्तवाडी (Nere Dattawadi) येथे घडला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत गणेश भीमराव वायकर (वय 21 रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात यांनी फिर्याद दिली. त्यानुसार तय्युब बाबू शेख (वय 35), बाबू मेहबूब शेख (वय 60 रा. नेरे दत्तवाडी, मुळशी) या दोघांवर आयपीसी 326, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यामुळे त्यांच्या घरी नातेवाईक व मित्र जेवणासाठी आले होते. त्यावेळी गणेश यांच्या घराच्या पत्र्यावर तय्युब याने दगड मारून पळून गेला. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व त्यांचे घरी आलेले नातेवाईक आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी आरोपी हातात लोखंडी गज घेऊन बाहेर आला. त्याने शिवीगाळ करत लोखंडी गज फिर्यादीच्या डोक्यात मारला. त्यावेळी गणेश याचे मामा वाचवण्यासाठी आले असता त्यांच्याही डोक्यात गज मारुन त्यांना जखमी केले. भांडणे सोडवण्यासाठी फिर्य़ादीचा मित्राने मध्यस्थी केली असता बाबू शेख याने प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करत त्याला देखील जखमी केले. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.