Viman Nagar Pune Crime News | पुणे : शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष दाखवून महिला डॉक्टरची 11 लाखांची फसवणूक

0

पुणे : – Viman Nagar Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग (Investment In Share Market) आणि आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून (Lure Of Good Returns) ज्येष्ठ महिला डॉक्टरची 11 लाखांची फसवणूक केली (Cheating Fraud Case). हा प्रकार ऑक्टोबर 2022 ते एप्रिल 2023 या कालावधीत विमानगर भागातील दत्त मंदिर चौकातील जीवन ज्योत क्लिनीक येथे घडला. पैसे घेतल्यानंतर आरोपी फरार झाला असून विमानतळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

याबाबत 70 वर्षीय महिला डॉक्टरने मंगळवारी (दि.7) विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अमित सुरेश भावेकर (रा. ग्लोब कॅपीटल मार्केट लि., अे.बी. इन्व्हेस्टमेंट, कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर, पुणे) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.

आरोपी अमित भावेकर याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आरोपीने फिर्यादी यांना विश्वासात घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून त्यांना चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच फिर्यादी यांनी गुंतवलेली रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवणार असल्याचे सांगून 11 लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना कोणताही परतावा दिला नाही. तसेच गुंतवणुकीच्या बहाण्याने घेतलेली रक्कम परत न करता कोठेतरी निघून गेला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ढावरे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.