Cheating Fraud Case | पुणे : केंद्रीय विद्यालयात प्रवेश देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक

0

पुणे : – Cheating Fraud Case | खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयात (Kendriya Vidyalaya Khadakwasla) इयत्ता पहिलीमध्ये मुलीचे अॅडमिशन करुन देतो (Lure Of Admission) असे सांगून एका व्यक्तीची दीड लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 28 मार्च 2022 ते 17 जुलै 2022 या कालावधीत वारजे माळवाडी (Warje Malwadi Police Station) येथील हॉटेल सुवर्ण येथे घडला आहे.

याबाबत रोहित विजय कुलकर्णी (वय-43 रा.कोंढवे धावडे, पुणे) यांनी शनिवारी (दि.4) वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अजित रामकृष्ण घाटपांडे Ajit Ramakrishna Ghatpande (रा. कात्रज-कोंढवा रोड, गोकुळनगर, कात्रज) याच्यावर आयपीसी 420, 406, 409, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजित घाटपांडे याने फिर्य़ादी यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या मुलीचे केंद्रीय विद्यालय गिरीनगर, खडकवासला येथे इयत्ता पहिलीमध्ये अॅडमिशन करुन देण्याचे आश्वासन दिले. मुलीचे अॅडमिशन करण्यासाठी अजित घाटपांडे याने वेळोवेळी फिर्यादी यांच्याकडून फोन पे द्वारे एक लाख 43 हजार रुपये घेतले. पैसे दिल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीचे अॅडमिशन केले नाही.

फिर्यादी रोहित कुलकर्णी यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी त्याने पैसे परत न करता पुन्हा पैसे मागितले तर ‘तुम्हाला तरी संपवेन किंवा मी स्वत: आत्महत्या करेल’ अशी धमकी दिली. आरोपीने केवळ रोहित कुलकर्णी यांच्याकडून पैसे घेतले नाहीत, तर फिर्यादी यांच्या ओळखीच्या अनेकांना अॅडमिशन करुन देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे नीळकंठ जगताप करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.