Pune Crime News | पुणे : सराईत गुन्हेगाराच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

0

पुणे : – Pune Crime News | सराईत गुन्हेगाराकडून (Criminal On Police Record) वारंवार होत असलेल्या त्रासाला व जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिल्याने एका तरुणाने राहत्या घरात गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे (Suicide Case). ही घटना 30 एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठेत (Mangalwar Peth Pune) घडली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सिद्धार्थ विजय फडतरे (रा. मंगळवार पेठ, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सिद्धार्थ याची आई अनिता विजय फडतरे (वय-40) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रोमियो कांबळे व संकेत कांबळे (दोघे रा. भिमनगर, मंगळवार पेठ, पुणे) यांच्यावर आयपीसी 306, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी संकेत कांबळे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात यापूर्वी मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा मुलगा सिद्धार्थ याला मागील एक वर्षापासून वारंवार मारण्याची धमकी दिली. तसेच 28 एप्रिल रोजी रोमियो कांबळे याने सिद्धार्थ याला गळा कापून टाकण्याची धमकी दिली. तर 30 एप्रिल रोजी आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला नागझरी नाल्याजवळ गाठून हाताने बेदम मारहाण केली. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींच्या त्रासाला कंटाळुन फिर्यादी यांच्या मुलाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.