Lonikand Pune Crime News | पुणे : इंस्टाग्राम वरील मैत्री पडली महागात, अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढत भेटायला बोलावून केले लैंगिक अत्याचार

0

पुणे : – Lonikand Pune Crime News | इंस्टाग्रामवर एका अल्पवयीन मुलीसोबत ओळख केली (Instagram Friendship). त्यानंतर त्याने मुलीला आपल्या जाळ्यात ओढत भेटण्यास बोलवले आणि संधीचा फायदा घेत तिचे फोटो काढले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. हा धक्कादायक प्रकार लोणीकंद परिसरात 7 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घडला आहे. (Rape Case Pune)

याबाबत 16 वर्षीय पिडित मुलीने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्य़ाद दिली. यावरुन अभि दिलीप कांबळे Abhi Dilip Kamble (वय -20 रा. बकोरी गाव) याच्यावर आयपीसी 376, 376(2)(एन), 363, 366-अ, 354-अ, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

महिला सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी (API Vijaya Vanjari) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडित तरुणी दोघेही शिक्षण घेतात. मार्च महिन्यात इंन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली. त्यानंतर अभि कांबळे याने पिडित तरुणीला जबरदस्तीने भेटण्यासाठी बोलावून घेतले. मुलगी त्याला भेटण्यासाठी आली असता आरोपीने तिचे फोटो काढले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत चार ते पाच वेळा शारीरिक संबंध ठेवले.

4 एप्रिल रोजी आरोपीने पीडित तरुणीला जबरदस्तीने त्याच्या स्विफ्ट कारमध्ये बसवून खराडी भागातील आयटी पार्क येथील मोकळ्या मैदानात नेले. त्याठिकणी गाडीमध्ये तिच्यासोबत असभ्य वर्तन करुन तिचे अश्लील फोटो काढल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन अभि कांबळे याच्यावर गुन्हा दाखल केल आहे. पुढील तपास एपीआय विजया वंजारी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.